४० आमदारांचा मुख्यमंत्री यात काळेबेरे, अजित पवारांना संशय

ajit pawar

ज्या भाजपकडे १०६ आमदार आहेत, त्या पक्षाचा मुख्यमंत्री होत नाही. मात्र, ज्या गटाचे ४० आमदार आहेत त्याचा मुख्यमंत्री होतो. यावरून या सरकारमध्ये नक्कीच काळेबेरे आहे, असा संशय व्यक्त करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ज्‍या-ज्‍या वेळी बाळासाहेबांची शिवसेना फोडण्याचा प्रयत्‍न काही नेत्‍यांनी केला.त्‍यांच्यासोबत गेलेला आमदार परत निवडून आला नाही.कारण शिवसैनिक हा कधीच नेत्‍यांसोबत जात नाही.तो शिवसेनेसोबतच राहतो हा इतिहास आहे, याची आठवण करून देत पवार यांनी येत्‍या निवडणुकीत हेच चित्र दिसेल,असा इशारा दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक प्रस्ताव आज विधानसभेत संमत झाला. त्यावेळी शिंदे सरकारचे अभिनंदन करताना अजित पवार यांनी आज जोरदार बाटिंग केली. एकनाथ शिंदे हे कर्तुत्‍ववान आहेत असा उल्‍लेख देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. हा धागा पकडत शिंदे जर इतके कर्तुत्‍ववान होते तर फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री असताना एमएसआरडीसी सारखे खाते का दिले? असा सवाल पवार यांनी केला.

राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी आता एकदम ॲक्‍शन मोडमध्ये आले आहेत. नाना पटोले यांनी राजीनामा दिला.त्यानंतर सव्वा वर्ष परवानगी द्यावी म्हणून आघाडीच्यावतीने राज्यपालांकडे मागणी करत होतो. मात्र आता निवड ताबडतोब झाली. इतकी जलद घटना झाली की त्यामुळे राज्यातील लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी एकनाथ शिंदे आणि आम्ही राज्यपालांना भेटायचो.त्यानंतर सगळे गेल्यावर राज्यपाल काय गप्पा मारायचे हे शिंदे तुम्हाला माहीत आहे,असेही ते म्‍हणाले.

मी कधीही अन्याय केला नाही

मी निधीवाटपात अन्याय केल्‍याच्या तक्रारी बंडखोर आमदारांनी केल्‍या.काँग्रेसचे काही नेतेही तसे म्‍हणाले.पण मी कधीच कोणावर अन्याय केला नाही. मी आमदार निधी १ कोटीवरून ५ कोटीवर नेला.डोंगरी विकास निधीही वाढविला.बंडखोर आमदारांच्या मतदार संघात तसेच खात्‍याला किती निधी दिला याची यादीच अजित पवार यांनी वाचून दाखवली.नगरविकास खात्‍यालाही १२ हजार कोटी रूपये दिले.अर्थात हे काही मी उपकार केले नाहीत.तसेच अर्थसंकल्‍पावर शेवटचा हात मुख्यमंत्रीच फिरवत असतात.मग मी अन्याय केला हे कसे?असा सवाल अजित पवार यांनी निधीवरून राष्ट्रवादीला बदनाम करू नका, असे बजावले.

तिकडे गेल्यावर ही अनैसर्गिक युती आहे असे बोलत आहात. काहींनी राष्ट्रवादीने अन्याय केला असा पाढा वाचला आहे. मी अर्थमंत्री म्हणून काम करत असताना कधीच भेदभाव केला नाही. आमदारांचा निधी एक कोटीवरुन पाच कोटीवर केला. डोंगरी विकासाचा निधी वाढवला. नगरविकास खात्याला सुरुवातीला ३६१ कोटी दिले त्यानंतर २६४५ कोटी दिले. भेदभाव करणारा मी माणूस नाही. सर्व खात्याला निधी दिला. फडणवीस तुम्हीही मुख्यमंत्री होतात. अर्थसंकल्पावर अंतिम हात मुख्यमंत्री फिरवतात. राष्ट्रवादीने कधी अन्याय केला नाही. लोकप्रतिनिधींच्या शिफारशीने ४०१ शिवभोजन थाळी केंद्र शिवसेनेला दिली. हे काम केले तर मी उपकार केलेले नाहीत. सांगायचे तात्पर्य असे की राष्ट्रवादीने अन्याय केला असा आरोप आमच्यावर होत आहे. मात्र राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला तो योग्य नाही. यावेळी अजित पवार यांनी किती निधी कोणाकोणाला दिला त्याची यादीच सभागृहात वाचली.

बंडखोरांना निधी वाटप

एकनाथ शिंदे ……………….३६६ कोटी
संदीपान भुमरे …………….१६७ कोटी
उदय सामंत …………….२२१ कोटी
दादा भुसे………….३०६ कोटी
गुलाबराव पाटील……३०९ कोटी
शंभूराज देसाई…….२९४ कोटी
अब्दुल सत्तार………३०६ कोटी


हेही वाचा : माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची उचलबांगडी