घरमहाराष्ट्रहे राजकारण आहे भावा! अजितदादांनी घेतली सेनेच्या कार्यालयात बैठक, तर...

हे राजकारण आहे भावा! अजितदादांनी घेतली सेनेच्या कार्यालयात बैठक, तर…

Subscribe

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील असा कोणी विचार पण केला नव्हता. परंतु, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे तिन पक्ष एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. महाराष्ट्रातील राजकारणाचा चेहरा-मोहरा महाविकास आघाडीने बदलून टाकला. वेगवेगळ्या विचारसरणीचे हे पक्ष एकत्र येतील असं कोणाला वाटलं पण नाही. परंतु हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन दीड वर्ष झालं. हे राजकीय पक्ष कधी एकमेकांच्या शाखेत, पक्ष कार्यालयात गेले नसतील. मात्र, आता चक्क एकमेकांसाठी, एकमेकांच्या पक्षाच्या शाखेत जाऊन बैठका घेताना पाहायला मिळत आहे.

सत्तेत एकत्र असलेले तीन पक्ष निवडणुकीतही एकत्र असल्याचं चित्र सध्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत दिसत आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारासंघासाठी राष्ट्रवादीचे भगिरथ भालके हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांच्या विजयासाठी अजित पवार यांनी जिवाच रान केलं आहे. पंढरपूर, मंगळवेढ्यातील गावागावात ते गेले. शिवाय, काल एक वेगळंच चित्र बघायला मिळालं. अजित पवार चक्क शिवसेनेच्या मंगळवेढ्यातील कार्यालयात गेले आणि तिथे त्यांनी निवडक कार्यकर्त्यांची बैठक घेतली. सेनेच्या विरोधात गेली ३० वर्षे राजकारण करत असलेले अजित पवार शिवसेनेच्या कार्यालयात हा एक चमत्कारच! हा फोटो जबरदस्त व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

याशिवाय, दुसरीकडे शिवसेनेची तोफ म्हणून ओळख असलेले आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराब पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यासाठी मतं मागत आहेत. ३६ वर्षांच्या शिवसेनेच्या प्रवासात मी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो की, ३६ वर्षांच्या राजकारणात घड्याळाला मत द्या हे सांगण्याची संधी त्यांनी मला दिली, असा टोला गुलाबरावांनी त्यांच्या भाषणात लगावला. त्यांचं अन् आमचं ‘लव्ह मॅरेज’ होतं. नवरदेव कोण अन् नवरी कोण यापेक्षा लफडं होतं हे पक्कं आहे. ते कसं झालं कसं तुटलं हे तुम्हाला सगळं माहिती आहे, असे बोलतानाच गुलाबराव पाटील यांनी, ‘तुमच्यामुळे (देवेंद्र फडणवीस) हे दिवस आले… प्यार का वादा फिप्टी-फिप्टी’ केलं असतं तर हे दिवस आले नसते, असं गुलाबरावांनी बोलताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -