बारामती (पुणे) : पावसाने दिलेली उघडीप शेतकऱ्यांची चिंता वाढवून जाणारी आहे. सध्या जरी पाऊस बरसत असला तरी अद्यापही अनेक भांगात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निवारण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.(Ajit Pawar In Action : Advice to authorities to deal with drought-like situation)
राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याआधी बारामतीत दाखल झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा बारामतीत दाखल झालेले अजित पवार यांनी दुष्काळसदृश्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बारामती गाठली होती. यावेळी त्यांनी संपूर्ण भागाची पाहणी केल्यानंतर बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
हेही वाचा : जरांगेंच्या मागण्या मान्य करण्यासाठी काही वेळ लागणार – अर्जुन खोतकर
या गावाचा केला पाहणी दौरा
बारामतीत शुक्रवारी दाखल झालेल्या अजित पवारांनी बारामती तालुक्यातील जळगाव सुपे, जळगाव कडेपठार, देऊळगाव रसाळ, काऱ्हाटी, तरडोली, आंबी बु., आंबी खुर्द, सुपे आदी गावे व वाड्या-वस्त्यांना भेटी दिल्या. सुप्यात रात्री साडेनऊच्या दरम्यान त्यांचे आगमन झाले होते.
हेही वाचा : ठाकरे गटाला पुन्हा एक धक्का; रवींद्र वायकरांनी माहिती लपवल्याचा उच्च न्यायालयाचा ठपका
पाणीटंचाई निवारण्याबाबत दिली माहिती
पवार म्हणाले खरीप हंगामातील पीके पावसाअभावी करपून गेली. काही शेतकऱ्यांनी पीके मोडून काढली. आता रब्बीचा विचार करू लागले आहेत. मात्र, अद्यापही पाऊस नसल्याने अडचणीची स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत जनाई, शिरसाई, पुरंदर उपसा जल सिंचन योजना, निरा डावा कालवा, खडकवासला कालवा यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न चालू आहे. बारामती, दौंड व पुरंदरमधील गावांना पाणी द्यावे लागणार आहे. काही भागात टँकर सुरू करण्याची मागणी आहे. सुपे येथील गावठान तलावात योजनेद्वारे पाणी सोडले तर टँकर भरता येतील. त्यामुळे लगतच्या टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याची सोय करता येईल अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
पाणी वाटपाचा ठरवून दिला क्रम
कऱ्हानदी कोरडी ठणठनीत आहे. थोडे पाणी असलेली काही ठिकाणची पीके वगळता ऊसाची दयनीय अवस्था झाली आहे. पाण्याविषयी प्रथम माणसांना, जनावरांना मग शेतीचा विचार करू पाण्याचे संकट मोठे आहे, काटकसर करा. अडचणीच्या काळात राज्य सरकारकडून जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. यावेळी दुध दर, रस्ते, घरकुल, बंद पाईपातून पाणी मागणी, विकास निधी आदी प्रश्नांविषयी त्यांनी लागलीच संबंधित अधिकाऱ्यांना सुचना केल्या. तालुक्यातील स्थगित झालेली कामे सुरू झाली असून, 65 कोटींचा निधी उपलब्ध झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले.