घरताज्या घडामोडीCorona Virus Update : करोनाग्रस्त चालक ओला कॅबचा नव्हताच!

Corona Virus Update : करोनाग्रस्त चालक ओला कॅबचा नव्हताच!

Subscribe

करोना व्हायरसची लागण झालेल्या पुण्यातील दाम्पत्याने मुंबई विमानतळावरून घेतलेली कॅब ओला नसून खासगी होती, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

पुण्यात ५ रुग्णांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यापासून राज्य सरकार आणि आरोग्य विभागाशी संबंधित प्रशासन कामाला लागलं आहे. हे ५ करोनाग्रस्क कुणा-कुणाच्या संपर्कात आले होते, त्यांची माहिती काढून त्यांच्या तपासण्या करण्याचं काम युद्धपातळीवर प्रशासनाने हाती घेतलं आहे. त्यासाठी डॉक्टरांची एक टीम देखील तयार करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील करोनाग्रस्तांसंदर्भात नवा खुलासा समोर आला आहे. दुबईहून मुंबई विमानतळावर उतरलेलं दाम्पत्य ओला कॅबने पुण्याला गेलं होतं. त्यामुळे त्यांच्यासह कॅब चालकाला देखील करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, ही कॅब ओलाची नव्हतीच, अशी माहिती आता समोर आली आहे!

असा सापडला करोनाग्रस्त ड्रायव्हर!

४० जणांच्या गटासोबत दुबईला गेलेल्या पुण्यातल्या एका दाम्पत्याला, त्यांच्या मुलीला, त्यांच्या कॅब चालकाला आणि त्यांच्यासोबतच्या एका सहप्रवाशाला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. तेव्हापासून ओला कॅबने प्रवास करणाऱ्यांमध्ये भितीचं वातावरण होतं. तसेच, आता ओला कॅबचालकांची देखील तपासणी केली जाण्याची शक्यता होती. मात्र, या दाम्पत्याने पुण्याला जाण्यासाठी घेतलेली कॅब ओलाची नसून दुसरीच खासगी कॅब होती, अशी माहिती खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे ओला कंपनीने सुटकेचा नि:श्वास टाकला असेल.

- Advertisement -

वाचा सविस्तर – करोना व्हायरस : पुण्यातील शाळा बंद!

काय म्हणाले अजित पवार?

‘हे दाम्पत्य खासगी गाडीने पुण्याला गेलं होतं, ती ओला कॅब नव्हती. मांजरीच्या परिसरातला हा चालक आहे. आता या कॅबचालकाने ज्यांना ज्यांना सोडलं, त्यांची तपासणी करण्याचं काम सुरू आहे. असे एकूण ७ ते ८ लोकं आहेत. त्यांची देखील तपासणी सुरू आहे. त्यांना जर करोनाची लागण झाली असेल, तर हा करोना झपाट्याने फैलावतोय असं चित्र निर्माण होईल. पण घाबरून जाऊ नका. काळजी घ्या. त्या ८ लोकांचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला, तर काही वेगळे निर्णय घेतले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही’, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -