घरमहाराष्ट्रपवारसाहेब राजीनाम्यावर ठाम, नव्या अध्यक्षाला साथ देऊ : अजित पवार

पवारसाहेब राजीनाम्यावर ठाम, नव्या अध्यक्षाला साथ देऊ : अजित पवार

Subscribe

शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर कार्यक्रमस्थळी कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांनी एकच गोंधळ घालत पवार यांना निर्णय मागे घेण्याची मागणी केली. पण यावेळी मात्र अजित पवार यांनी पवारांच्या निर्णयाला पाठिंबा देत नवीन अध्यक्षाला साथ देण्याचे आवाहन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज मंगळवारी (ता. 5 मे) ‘माझे सांगाती… राजकीय आत्मकथा’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. पण यावेळी शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर कार्यक्रमस्थळी कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांनी एकच गोंधळ घालत पवार यांना निर्णय मागे घेण्याची मागणी केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देखील यावेळी अश्रू अनावर झाले तर जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील या सर्वांनी शरद पवार यांची मनधरणी करण्यास सुरूवात केली. पण यावेळी मात्र अजित पवार यांनी पवारांच्या निर्णयाला पाठिंबा देत नवीन अध्यक्षाला साथ देण्याचे आवाहन केले. तर याबाबत शरद पवार यांची मुलगी आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काहीही बोलू नये, असे सांगितले.

हेही वाचा – शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मनधरणी

- Advertisement -

एकीकडे शरद पवार यांनी निवृ्त्तीची घोषणा केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भूकंप झाला. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचे काम पक्षातील सर्वच नेते करत असताना अजित पवार यांनी त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देत म्हणाले की, “सगळ्यांच्या भावना साहेबांनी ऐकल्या. तुम्ही एक गैरसमज करून घेताय, पवार साहेब अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षाचा भाग नाही असे नाही. आज काँग्रेसमध्ये अध्यक्ष खर्गे असले तरी ते पक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पाहून सुरू आहे. पवार साहेबांच्या वयाचा विचार करता साहेबांशी आणि सगळ्यांशी चर्चा करून एका नवीन नेतृत्वाकडे आपण जबाबदारी देऊ पाहतोय. ते नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल,” असे अजित पवार यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.

पवारसाहेब म्हणजेच पार्टी
शरद पवार हेच पार्टी आहेत, हे येड्या गबाळ्याने पण सांगायचे कारण नाही. त्यामुळे आता पवारसाहेबांनी तो निर्णय घेतला आहे. पवारसाहेब हे लोकशाहीत जनतेचे ऐकत असतात. हे आपण पाहिलेले आहे. त्यामुळे ते पदावर नसले तरी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहेत. उद्या पक्षाचा अध्यक्ष कोणीही झाला तरी पवारांच्या नेतृत्वातच काम करेल असेही अजित पवार यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

- Advertisement -

हा निर्णय 1 मे लाच होणार होता
27 एप्रिलला 3 तास अजित पवार आणि शरद पवार यांच्यात दोन तास चर्चा झाली आणि हा तोडगा ठरला होता. सुप्रिया सुळे , प्रतिभा पवार अजित पवार आणि शरद पवार यांच्यात निर्णय ठरला होता. हा निर्णय कालच होणार होता मात्र काल 1 मे असल्यामुळे निर्णय जाहीर केला नाही. आज ना उद्या हा निर्णय होणार होता, असे म्हणत अजित पवार यांनी आपली ठोल भूमिका स्पष्ट केली. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवा अध्यक्ष काम करेल. देशभरात मीटिंग करणे, लोकांना भेटणे सुरू राहिल. कोणीही अध्यक्ष झाले, प्रांताध्यक्ष झाले तरी शरद पवार यांच्याच मार्गदर्शनाखाली हा पक्ष चालणार आहे.

त्यांनी स्वतःपासून भाकरी फिरवली
शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी “आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. एवढचं नाही तर पक्षात याबाबत विलंब करुन चालणार नाही. पक्षातील लोकांना तसं सांगावं लागणार,” असे वक्तव्य केले होते. याबाबत अनेक चर्चा झाली. पण त्यांनी स्वतःपासून भाकरी फिरवली. पक्षाचा अध्यक्ष जो होईल, तो पवारांच्या मार्गदर्शनाखालीच काम करेल. साहेब, अध्यक्ष राहिले तरच अल्पसंख्यांकाच्या पाठी राहतील, नाही तर नाही, असं तुम्ही का मनात आणता. आपला परिवार असाच राहील. भावनिक होऊ नका. परवाच त्यांनी सांगितलं. भाकरी फिरवायची असते. काकींशी बोललो. त्या म्हणाल्या, साहेब निर्णय मागे घेणार नाही. त्यामुळे तुम्ही पर्याय नाही असं म्हणू नका. अरे साहेब आहेतच ना. साहेबांच्या नेतृत्वात नवा अध्यक्ष येईल. त्याला आपण साथ देऊ. त्यांना पाठबळ देऊ.

अजित पवार संतापले
सर्वांनी साहेबांसोबत काम केलेल आहे. पण काळानुरुप काही निर्णय घ्यावे लागतात. साहेबांच्या डोळ्यांदेखत नवे नेतृत्व तयार झालं तर तुम्हाला का नको रे? असे म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांवर नाराजी व्यक्त केली. तर मला काही कळत नाही तुमचं. उद्या नवीन अध्यक्ष झाल्यावर साहेब त्या अध्यक्षाला राजकारणातले बारकावे सांगतील ना. साहेब बोलावतील तेव्हा सर्व येणारच आहेत. साहेब देशात फिरणारच आहे. त्यांचं मार्गदर्शन मिळणारच आहे, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

“सुप्रिया अजिबात बोलू नकोस…”
यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांनी देखील बोलावे, वडीलांना विनंती करावी, असे भावनिक आवाहन केले. मात्र त्यानंतर अजित पवारांनी लगेच माईक घेत ”सुप्रिया अजिबात बोलू नकोस..मी मोठा भाऊ म्हणून सांगतोय”, असे सांगितले. तर शरद पवार यांनी सुद्धा सुप्रिया सुळे यांना न बोलण्याचा इशारा केला. उद्या नवीन अध्यक्ष झाला तर अडचण काय आहे? शरद पवारांनी हाक दिल्यावर सगळे एकत्र येणार आहेत. खासदारकी आमदारकी बाबत सर्व निर्णय तेच घेतील, असेही अजित पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -