Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू; कुणी म्हटले असे? वाचा-

अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू; कुणी म्हटले असे? वाचा-

Subscribe

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने पवार कुटुंबियांवर या ना त्या कारणाने टीका करत असतात.

मुंबई : राज्यातील राजकारण सध्या आरक्षणाभोवती फिरत असल्याचे दिसत आहे. मराठा आंदोलकांपाठोपाठ आता ओबीसी समाजही रस्त्यावर उतरला असून, दुसरीकडे धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्र्याना पत्र लिहून मागणी केली आहे. यादरम्यान तुम्ही अजित पवारांकडे पत्र लिहून मागणी का केली नाही असे विचारले असता त्यांनी अजिच पवारांवर बोचरी टीका केली आहे. यामुळे आता राज्यातील राजकारण पेटण्याची शक्यता आहे.(Ajit Pawar is a lying cub of a lying wolf Who said that read)

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने पवार कुटुंबियांवर या ना त्या कारणाने टीका करत असतात. दरम्यान आता शिंदे-फडणवीस यांच्यासोबतच सत्तेत अजित पवारही सहभागी झाले आहेत. तेव्हा गोपीचंद पडळकरांची भूमिका मवाळ होईल असे वाटत असताना मात्र, त्यांनी आज थेट अजित पवारांवर बोचरी टीका केल्याने पुन्हा एकदा राज्यातील राजकारण पेटण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा : आमदार अपात्रता प्रकरणात वेळकाढूपणा का करताय? सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना सुनावले

काय म्हणाले पडळकर अजित पवारांबद्दल?

आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून धनगर समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. याबाबत माध्यम प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारले की, तुम्ही अजित पवारांना पत्र का पाठवले नाही? त्यावर पडळकर म्हणाले की, अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. पडळकरांनी सुप्रिया सुळे यांनाही लबाड लांडग्याची लेक, म्हटले. तेव्हा या टीकेवरून राज्यातील राजकारण पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisement -

हेही वाचा : घाईत निर्णय घेऊन कोणावर अन्याय करणार नाही- राहुल नार्वेकर

अजित पवारांना पत्र दिले नाही आणि देणारही नाही

यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर हे म्हणाले की, अजित पवारांची आमच्या विषयी स्वच्छ भावना नाही, त्यामुळे आम्ही त्यांना पत्र देण्याची गरज नाही. त्यांना आम्ही मानत नाहीत. त्यामुळे त्यांना आम्ही कधी पत्र दिले नाही आणि पुढेही पत्र देण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो त्यांना मी पत्र दिले आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

- Advertisment -