Homeमहाराष्ट्रAnjali Damania : दमानियांनी दिलेले पुरावे बघून अजितदादाही गंभीर, थेट फडणवीसांशी चर्चा...

Anjali Damania : दमानियांनी दिलेले पुरावे बघून अजितदादाही गंभीर, थेट फडणवीसांशी चर्चा करणार

Subscribe

अंजली दमानियायांनी मागील दीड महिन्यापासून संतोष देशमुख हत्याप्रकरण लावून धरले आहे. सोबतच त्यांनी आपल्या सोशल मीडियावर सातत्याने काही कागदपत्रे टाकून बीडमधील दहशत आणि कराड-मुंडे यांच्यातील आर्थिक हितसंबंधांचे दावे केले आहेत, परंतु या गुन्ह्याशी संबंधित कुठलेही ठोस पुरावे समोर येत नाहीत तोपर्यंत धनंजय मुंडे यांना पाठीशी घालण्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. त्यातच अजित पवार यांच्याशी छत्तीसचा आकडा असूनही सोमवारी रात्री अंजली दमानियायांनी अजित पवार यांची देवगिरी यासरकारी निवासस्थानी भेट घेतली.

मुंबई : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधी पक्षाने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. दमानियायांनी मागील दीड महिन्यापासून संतोष देशमुख हत्याप्रकरण लावून धरले आहे. सोबतच त्यांनी आपल्या सोशल मीडियावर सातत्याने काही कागदपत्रे टाकून बीडमधील दहशत आणि कराड-मुंडे यांच्यातील आर्थिक हितसंबंधांचे दावे केले आहेत, परंतु या गुन्ह्याशी संबंधित कुठलेही ठोस पुरावे समोर येत नाहीत तोपर्यंत धनंजय मुंडे यांना पाठीशी घालण्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. त्यातच अजित पवार यांच्याशी छत्तीसचा आकडा असूनही सोमवारी रात्री अंजली दमानियायांनी अजित पवार यांची देवगिरी यासरकारी निवासस्थानी भेट घेतली. (Ajit Pawar is also serious after seeing the evidence given by Anjali Damania)

अजित पवारांसोबतच्या भेटीत अंजली दमानिया यांनी कराड-मुंडे यांच्यातील आर्थिक हितसंबंधांचे पुरावे अजित पवारांना सादर करीत मुंडेंकडून राजीनामा घेण्याची मागणी केली. दमानियांकडून पुरावे मिळाल्यावर आता  अजित पवार मुंडेंच्या राजीनाम्यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अंजली दमानिया यांनी सांगितले की, माझा आणि अजित पवार यांचा छत्तीसचा आकडा असूनही आज मी अजित पवार यांची भेट घेत त्यांच्याकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातील आर्थिक संबंधांचे पुरावे काही कागदपत्रांच्या स्वरूपात मी अजित पवारांना सादर केले आहेत.

हेही वाचा – Maharashtra : सहा हजार महाविद्यालयांमध्ये होणार संविधान गौरव महोत्सव – मंत्री चंद्रकांत पाटील

त्यामध्ये धनंजय मुंडे, राजश्री मुंडे, वाल्मिक कराड यांचे अनेक व्यवसाय एकत्र आहेत. त्यांच्या कंपन्यांमधून कसा आर्थिक नफा मिळतो. हे सगळं ऑफिस ऑफ प्रॉपर्टीमध्ये कसे बसते, हे मी अजित पवारांच्या कानावर घातले आहे. कागदपत्रांमध्ये बीडमधील त्यांच्या सर्व कंपन्यांच्या बॅलन्स शीटचा समावेश आहे. या सर्व बॅलन्स शीटवर मुंडे पती-पत्नी, कराडच्या सह्या आहेत. महाजनकोकडून राजश्री मुंडे, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना सरळसरळ आर्थिक फायदे मिळत आहेत.

आमच्या दोघांमध्ये या विषयावर जवळपास २० ते २५ मिनिटे चर्चा झाली. अजित पवार यांनी माझे बोलणे अतिशय गांभीर्याने ऐकून घेतले. सर्व कागदपत्रे पाहिली. अजित पवार मंगळवारी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांना ही कागदपत्रे दाखवण्याचे आणि त्यावर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन अजित पवार यांनी मला दिल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले.

हेही वाचा – CM Fadnavis on Fisheries : गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी मुख्यमंत्र्यांचे हे निर्देश, वाचा सविस्तर

धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार?

सोबतच बीडमध्ये असलेल्या मुंडे-कराड यांच्या दहशतीचे पुरावे, काही रिल्सदेखील मी अजित पवार यांना दाखवले आहेत. आतापर्यंत माहीत नसलेल्या अनेक गोष्टी अजित पवार यांच्यापुढे आणल्या आहेत. त्यांनी सर्व गोष्टी समजून घेतल्या आहेत. आता यावर ते योग्य कारवाई करून धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील अशी अपेक्षा आहे, असे अंजली दमानिया यांनी सांगितले. माझा आणि अजित पवार यांचा छत्तीसचा आकडा असूनही आज मी अजित पवारयांची भेट घेतली. त्यांच्यासोबत २० ते २५ मिनिटे झालेल्या चर्चेत बीडमधील दहशतीचे आणि कराड-मुंडे यांच्यातील आर्थिक हितसंबंधांचे पुरावे त्यांना सादर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन अजित पवार यांनी मला दिले आहे, अशी माहितीही दमानिया यांनी दिली.

देशमुख यांचा पीएम रिपोर्ट योग्य आहे का?

अजित पवारांना भेटण्याआधी अंजली दमानिया यांनी आज सकाळीच आरोप केला होता की, वाल्मिक कराडला 3 दिवस ज्या रुग्णालयामध्ये ठेवले होते त्या रुग्णालयाचे डॉ. अशोक थोरात इन्चार्ज आहेत. त्यांनीच सरपंच संतोष देशमुख यांचे शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) केले होते. ते विधानसभा आणि लोकसभा लढवण्यासाठी आग्रही होते. अंबेजोगाई शहरात त्यांचे टोलेजंग हॉटेल आहे. त्यामुळे त्यांनी दिलेला संतोष देशमुख यांचा पीएम रिपोर्ट योग्य आहे का, अशी शंका अंजली दमानियांनी व्यक्त केली होती.

हेही वाचा – CM Fadnavis on Fisheries : गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी मुख्यमंत्र्यांचे हे निर्देश, वाचा सविस्तर

बीडमधील २६ पोलीस कराडच्या मर्जीतले – तृप्तीदेसाई

सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे त्याचे निकटवर्तीय किंवा मर्जीतील असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे. त्यामुळे गृहमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांची बदली बीड जिल्ह्याबाहेर करावी. तरच बीड जिल्ह्यातील गुंडाराज रोखता येईल, अशी मागणीही तृप्ती देसाई यांनी सोशल मीडियाच्या पोस्टमधून केली. या सर्व 26 पोलिसांची नावेही त्यांनी दिली आहेत.

बीडच्या पोलिसांचे आकावर खूप प्रेम – सुरेश धस

दरम्यान, भाजपा आमदार सुरेश धस यांनी आरोप केला की, तृप्ती देसाई यांनी सांगितलेला आकडा फार कमी आहे. वाल्मिक कराडच्या दिमतीला असलेल्या सर्व पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांची बेरीज केली तर २०० पेक्षा जास्त हा आकडा जाईल. लवकरच या सर्वांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहे. बीडच्या पोलिसांचे आकावर खूप प्रेम आहे. पोलीस अधीक्षकांनी अशा अधिकाऱ्यांना अजून पोलीस दलात ठेवलेच कसे? बीडचे डीवाय एसपीदेखील आकाचेच आहेत. कराडचे पाय चेपायला कोणते पोलीसवाले माणसे आत सोडतात याची माहिती आमच्याकडे आहे. ३८ वर्षीय महादेव मुंडेंचाखून होऊन १५ महिने झाले. त्यांची अजूनही दाद ना फिर्याद घेतली. त्याला हाल हाल करून मारण्यात आले. कॉलेज ग्राऊंडवर त्याला मारले आणि तहसील कार्यालयापुढे फेकून दिले गेले. पोलीस अधीक्षकांनी ज्या पद्धतीने यंत्रणा हलवायला हवी होती तशी अजून हलवली नाही. १५ दिवसांत महादेव मुंडेंचे आरोपी पकडले गेले पाहिजेत, अशी मागणी सुरेश धस यांनी केली.

हेही वाचा – Thackeray Shivsena : पुण्यात राऊतांसमोर माजी आमदार तडकाफडकी बैठकीतून बाहेर पडले, नाराजीचं कारण अंधारे की…