घर महाराष्ट्र अजित पवारांचा सत्कार करता आणि शरद पवार झिंदाबाद म्हणता, काय चाललंय?; शिंदे गटाचा सवाल

अजित पवारांचा सत्कार करता आणि शरद पवार झिंदाबाद म्हणता, काय चाललंय?; शिंदे गटाचा सवाल

Subscribe

2 जुलै रोजी राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर अजुनही राजकीय वातावरण काही केल्या शांत होत नसल्याचे दिसून येत आहे.

मुंबई : राज्यातील राजकाण सध्या विविध घटनांनी चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. एकीकडे खरी शिवसेना कुणाची असा संभ्रम निर्माण झालेला होता. त्याचे उत्तर मिळते ना मिळते तोच आता राष्ट्रवादी कुणाची हा प्रश्न सर्वत्र विचारल्या जात आहे. दरम्यान राष्ट्रवादीतील या घडामोडींवर बोलताना शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाबाबत बोलताना थेट सवाल करीत हा संभ्रम दूर करावा अशी मागणीच केली आहे. (Ajit Pawar is felicitated and Sharad Pawar says long live, what’s going on?; A question from the Shinde group)

2 जुलै रोजी राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर अजुनही राजकीय वातावरण काही केल्या शांत होत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान एकीकडे राष्ट्रवादीचे शरद पवार सभा घेत आहेत तर त्यानंतर अजित पवार गटाकडून उत्तर सभेचे आयोजन केले जात आहे. दरम्यान काल बीडमध्ये झालेल्या अजित पवार यांच्या सभेनंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी कुणाची असा सवाल उपस्थित केल्या जात आहे. हाच मुद्दा घेत शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट राष्ट्रवादीतील नेत्यांवर निशाणा साधत हे काय चाललय असा सवाल केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : बारामती असो किंवा बीड… रोहित पवार यांचा अजित पवार गटावर निशाणा

काय म्हणाले गुलाबराव पाटील वाचा-

राष्ट्रवादी पक्षाच्या सद्यस्थितीवर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, आम्ही केलेल्या बंडानंतर आम्हा मागील वर्षभर गद्दार म्हणून संबोधण्यात आले. एवढेच नव्हे तर पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणाही देण्यात आल्या. मात्र आता अजित पवार आमच्याबरोबर आल्यानंतर यांचं तोंड उघडत नाही. हे राष्ट्रवादीवाले (राष्ट्रवादीतील नेते) आता का बोलत नाहीत. मुळात ही राष्ट्रवादी कुणाची ते सिद्ध करा आधी. राष्ट्रवादी शरद पवारांची आहे की, अजित पवारांची हे सिद्ध करा. एकीकडे तुम्ही अजित पवारांचा सत्कार करताय आणि शरद पवार जिंदाबाद म्हणताय, काय चाललंय असा थेट सवालच त्यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : छगन भुजबळांचे नाव न घेता अजित पवार म्हणाले; “राजकीय भूमिका मांडताना…”,

गुलाबराव पाटलांनी सांगितली तिन्ही पक्षाची स्थिती

यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, आमच्यासोबत राष्ट्रवादी (अजित पवार गट) आल्यानंतर त्यांनी या तिन्ही पक्षाची रचना कशी आहे हे सांगितले. ते म्हणाले की, शरिरातील वरचा भाग म्हणजे भाजप, पोट-कंबर म्हणजे शिवसेना(शिंदे गट) आणि खाली हात-पाय म्हणजे राष्ट्रवादी (अजित पवार गट) अशी रचना सांगून आमचे तीन पक्षाचे सरकार गतीमान असून, ते गतीने काम करत असल्याचे सांगत आहे.

- Advertisment -