घरताज्या घडामोडीकायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही - अजित पवार

कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही – अजित पवार

Subscribe

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी पोहोचणार का? याचीच चर्चा सुरू होती. त्यामुळे शिवसेना कार्यकर्ते मातोश्रीबाहेर आणि राणांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर ठाण मांडून बसले होते. त्यामुळे राणा दाम्पत्याला मातोश्रीपर्यंत पोहोचणं अशक्य झालं. मात्र, त्यांना अटक केल्यामुळे राजकीय वर्तुळात वातावरण तापलं आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणा दाम्पत्याला म्हटलं आहे.

कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही

अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, कुणावरच हल्ला व्हायला नको. कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही. प्रत्येकानं शांततेनं घ्यायला हवं. पण आपणही कुणालातरी उचकवण्याचा प्रयत्न करायला नको. आपण काम करत असताना माध्यमांनी मला एखादा प्रश्न विचारल्यानंतर मला तो नाही पटला तर त्यावर मी उलटं बोलण्यापेक्षा नो कॉमेंट्स म्हणून गप्प बसायला हवं, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी सगळं मंत्रिमंडळ प्रयत्न करत आहे. हे होत असताना त्यातून नवीन प्रश्न निर्माण होण्याच्या दृष्टीने काही घडू नये. तुम्ही अमरावतीचे लोकप्रतिनिधी आहात. तुम्ही बडनेऱ्याचे लोकप्रतिनिधी आहात. तिथे काम करत असताना मातोश्रीबद्दल आजच नाही, बाळासाहेब ठाकरे असल्यापासून शिवसेना कार्यकर्त्यांच्या भावना नेहमीच फार तीव्र असतात. लोक बाळासाहेबांना जाऊन भेटायचे, उद्धव ठाकरेंना जाऊन भेटतात. त्यांचं दैवत म्हणून ते त्यांच्याकडे बघत असतात. हा त्यांचा दृष्टीकोन आहे, असं देखील पवार म्हणाले.

अजित पवारांनी राणा दाम्पत्यांना दिला सल्ला

तुम्हाला असं काही करायचं असेल, तर तुमच्या घरात किंवा मंदिरात जाऊन करा, असा सल्ला अजित पवारांनी राणा दाम्पत्यांना दिला. कुणी, कुठं काय म्हणायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु त्यातून कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्याची जबाबदारी गृहखात्याची असते. काल पोलिसांनी सांगूनही राणा दाम्पत्याकडून काही गोष्टी घडल्या. त्यामुळे शिवसैनिक संतापले आणि जे व्हायला नको ते झाले. असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : फक्त २४ तासांसाठी गृहमंत्र्यांनी पोलिसांना सुट्टी द्यावी, नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -