घरताज्या घडामोडी'...आम्ही असलेच धंदे केले आहेत'; विधानसभेत अजित पवार आक्रमक

‘…आम्ही असलेच धंदे केले आहेत’; विधानसभेत अजित पवार आक्रमक

Subscribe

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना शिंदे-फडणवीस सरकारचे काही मंत्री गैरहजर होते. मंत्र्यांच्या अनुपस्थिती सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यामध्ये गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. आमदार हसन मुश्रीफ यांनी ग्रामविकासमंत्री नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सत्ताधाऱ्यांकडून मंत्री वरच्या सभागृहात असल्याचे सांगण्यात आले.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना शिंदे-फडणवीस सरकारचे काही मंत्री गैरहजर होते. मंत्र्यांच्या अनुपस्थिती सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यामध्ये गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. आमदार हसन मुश्रीफ यांनी ग्रामविकासमंत्री नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सत्ताधाऱ्यांकडून मंत्री वरच्या सभागृहात असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी वादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील आक्रमक झाले. “हे काय आहे, आम्ही असलेच धंदे केले आहेत आणि आम्हालाच सांगत आहेत”, अशा शब्दांत अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. तसेच, ‘हे सर्व मंत्री हजर होईपर्यंत तुम्ही सभागृह तहकूब करा’, असे जयंत पाटील यांनी सांगितले. (ajit pawar jayant patil dhananjay munde get angry over absence of minister)

“चर्चेसाठी ग्रामविकासमंत्रीच नाहीत”, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले. त्यावर जयंत पाटल यांनी ग्रामविकासमंत्री आल्याशिवाय चर्चा कशी करणार असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर लगेचच अजित पवार उभे राहिले आणि “अध्यक्ष महोदय, आपण नेहमीच नियमावर बोट ठेऊन चालतात. इथं स्वतः विधीमंडळाचे नेते एकनाथ शिंदे आहेत. विभाग ठरवून देण्यात आले आहेत, ग्रामविकास विभागाची चर्चा आहे आणि या विभागाचे मंत्रीच आज हजर नाहीत”, असे म्हटले. त्यावर “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात आहेत, असं मत मांडलं. यावर अजित पवार आक्रमक होत मुख्यमंत्री आहेत, म्हणून संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी हजर राहायचं नाही का? उत्तर कोण देणार आहे? असे सवाल केले. “आम्हीही उपमुख्यमंत्री म्हणून तिथं बसून कामं केली आहेत. आपण त्यावेळी इकडे होता. त्यावेळी त्या त्या विभागाचे मंत्र्याला किंवा राज्यमंत्र्याला हजर राहायला लावायचो”, यावर विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकरांनी “संबंधित मंत्र्यांना बोलवण्यात येत आहे”, असे म्हटले.

- Advertisement -

“आदिवासी मंत्री गावित आहेत, परंतु, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व गिरीश महाजन गैरहजर आहेत. हे काय आहे, वरच्या सभागृहाने सांगायचं खाली आहेत आणि खालच्या सभागृहाने सांगायचे वर आहे. आम्ही असलेच धंदे केले आहेत आणि आम्हालाच सांगत आहात. आम्ही सत्तेत होतो तेव्हा मी स्वतः खालच्या सभागृहात थांबायचो आणि शंभुराजे वरच्या सभागृहात थांबायचे”, असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच, “हा अध्यक्षांचा अवमान आहे. हे सर्व मंत्री हजर होईपर्यंत तुम्ही सभागृह तहकूब करा. त्याशिवाय यांच्यावर जरब बसणार नाही.” यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “जयंतराव असं का करता. मी अख्खा मुख्यमंत्री तुमच्या सेवेसाठी इथं बसलो आहे”, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

“या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, तर पुरवणी मागण्यांवर चर्चा व्हायला हरकत नाही. त्यांच्या सक्षमतेवर कुणाच्याही मनात शंका नाही. शंका असलीच तर त्यांच्या आजूबाजूला असू शकेल. मात्र, मुख्यमंत्र्यांवर कोणत्या कोणत्या गोष्टींचा भार देणार आहेत. शिक्षणमंत्र्यांचंही लिखाण काम त्यांनीच करायचं का? त्यामुळे १० मिनिटं सभागृह तहकूब करा. त्या मंत्र्यांना देखील जाणीव होऊ द्या. या सदनाचा, अध्यक्षांचा आणि मुख्यमंत्र्यांचा त्यांचे मंत्री अवमान करत असतील तर हे बरोबर नाही”, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – ओला दुष्काळ जाहीर न करणार्‍या शिंदे सरकारचा निषेध करत विरोधकांचा सभात्याग

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -