घरताज्या घडामोडीकोकण किनारपट्टीवर बहुउद्देशिय निवारा केंद्रे, भूमिगत वीज वाहिन्या उभारणार - अजित...

कोकण किनारपट्टीवर बहुउद्देशिय निवारा केंद्रे, भूमिगत वीज वाहिन्या उभारणार – अजित पवार

Subscribe

बहुउद्देशीय निवारा केंद्र उभारण्यात यावी तसेच ही केंद्रे दर्जेदार आणि चक्रीवादळाचा सामना करण्यास सक्षम असावीत

राज्यातील कोकण किनारपट्टीला चक्रीवादळासह अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असल्याने कोकणातील दरडग्रस्त गावांचे पुनर्वसन करण्यात येणार असून अशा गावांच्या पुनर्वसनांची कामे मार्गी लावण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केली. याशिवाय नैसर्गिक आपत्तीत होणारी जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी कोकणात आवश्यक ठिकाणी बहुउद्देशीय निवारा केंद्रे, भूमिगत वीज वाहिन्या, धूपप्रतिबंधक बंधारे, लाईटनिंग अरेस्टर उभारण्यात येणार आहेत. यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देशही अजित पवार यांनी दिले.

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोकण किनाऱ्यावर आदळणाऱ्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाच्यादृष्टीने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबतच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना पवार यांनी अजित पवार यांनी कोकोण किनारपट्टीवरील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्तावर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या भागात दरडग्रस्त गावांचे पुनर्वसन काम मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

गेल्या काही वर्षात कोकण किनारपट्टीला चक्रीवादळासह नैसर्गिक आपत्तीचा वारंवार सामना करावा लागत आहे. या चक्रीवादळ, नैसर्गिक आपत्तीत जीवित आणि वित्तहानीची तीव्रता कमी करण्यासाठी किनारपट्ट्यांवरील जिल्ह्यात आवश्यक ठिकाणी बहुउद्देशीय निवारा केंद्र उभारण्यात यावीत. ही बहुउद्देशीय निवारा केंद्रे दर्जेदार आणि चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सक्षम असावीत. नैसर्गिक आपत्तीच्या कालावधी व्यतिरीक्त इतर वेळी या निवारा केंद्रांचा उपयोग लोकोपयोगी कामांसाठी करण्यात यावा. याची कायमस्वरुपी देखभाल, दुरुस्तीचेही नियोजन करण्यात यावे, असे अजित पवार यांनी सांगि

- Advertisement -

मागील काही वर्षात कोकण किनारपट्टीवरील भागाला नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसत आहे. वादळांमुळे जिवित व वित्त हानी होत आहे. याची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्ह्यांत आवश्यक ठिकाणी बहुउद्देशीय निवारा केंद्र उभारण्यात यावी तसेच ही केंद्रे दर्जेदार आणि चक्रीवादळाचा सामना करण्यास सक्षम असावीत असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व्हिसीद्वारे उपस्थित होते. तर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, मुख्य सचिव सिताराम कुंटे इतर अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -