अहमदनगर : मागील काही दिवसांपासून राज्यात काहीजण महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करून राज्यातील वातावरण दुषित करीत आहेत. यामुळे सामाजिक-धार्मिक तेढ निर्माण होत असून, तणावाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी आणि काही महिन्यांपूर्वी शिर्डीचे साईबाबा यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमातून चांगलाच खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी महापुरूषांबद्दल बेताल वक्तव्य कराल तर खपवून घेणार नसल्याचे खडेबोल अप्रत्यक्षरित्या संभाजी भिडे यांना सुनावले.(Ajit Pawar lashed out Be careful if you make baseless statements about great men Harassment was heard in front of Shinde Fadvis)
संभाजी भिडे यांनी शिर्डीच्या साईबाबांबद्दल देखील आक्षेपार्ह उद्गार काढले होते. ते म्हणाले होते की, आपला हिंदू समाज साईबाबांना पुजतो, त्या साईबाबांना देव्हाऱ्यातून काढा. तर मागील महिन्यांत महात्मा गांधी यांच्या पितृत्वाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर जागोजागी भिडेंविरोधात आंदोलन आणि मोर्चे काढण्यात आले होते. दरम्यान आज अहमदनगर येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलेच सुनावले.
हेही वाचा : ‘या’ राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन नेत्यांनी केल्या मोफत योजनांच्या खैरातीची घोषणा; वाचा सविस्तर
काय म्हणाले अजित पवार वाचा-
यावेळी अजित पवार म्हणाले की, आपल्या सर्वांचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्यजननी जिजाऊ माँ साहेब, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीजोती सावित्रीबाई फुले राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ही सगळी महामानवं आपल्याकडे होऊन गेली. त्यांचा आदर्श ठेऊन आपण पुढे चाललो आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारापासून आम्ही यत्किंचितही बाजूला जात नाहीये. या राज्यात व देशात महामानवांचा आदर केलाच गेला पाहिजे. त्याबद्दल कुणीही कुठलंही बेताल वक्तव्य करता कामा नये. याबद्दलची खबरदारी राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सर्व सहकारी घेत आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
हेही वाचा : बीडच्या सभेत धनंजय मुंडे यांच्यावर आमदार संदीप क्षीरसागर यांची नाव न घेता टीका, म्हणाले…
संभाजी भिडेंच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे राज्यभर उमटले होते पडसाद
काही दिवसांपूर्वीच संभाजी भिडेंनी महात्मा गांधींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. याचे पडसाद थेट विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पडले. विरोधी पक्षांनी संभाजी भिडेंच्या अटकेचीही मागणी केली. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच महामानवांबद्दलच्या बेताल वक्तव्यांचा समाचार घेतला.