राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) माजगावमधील आमदार प्रकाश सोळंके यांनी स्वपक्षातील नेते, मंत्री धनंजय मुंडे यांनाच लक्ष्य केले आहेत. 2019 ते 2024 मध्ये धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडला आपलं पालकमंत्रिपद भाड्यानं दिले होते. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घ्यावे, अशी मागणी प्रकाश सोळंके यांनी केली आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह अन्य तीन आरोपींना तातडीनं अटक करावी, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी बीडमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर झालेल्या सभेत प्रकाश सोळंके बोलत होते.
हेही वाचा : “कराडला घो*** लावल्याशिवाय शांत नाही बसणार, मुंडेंना…”, नरेंद्र पाटील संतापले; फडणवीसांनाही विचारला सवाल
प्रकाश सोळंके म्हमाले, “संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी 19 दिवसानंतरही मोकाट आहेत. खंडणीतील आरोपी वाल्मिक कराडलाही अटक झाली नाही. गेल्या पाच वर्षात चार वर्षे धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. पंकजाताईंनी सांगितलेलं, ‘धनंजय मुंडेंनी आपलं पालकमंत्रिपद भाड्यानं दिलं होते.’ हे पालकमंत्रिपद वाल्मिक कराडला दिले होते.”
“एक घटनाबाह्य सत्ताकेंद्र आणि पालमंत्रिपदाचे सत्ताकेंद्र मिळाल्यानंतर वाल्मिक कराडनं पोलीस आणि संपूर्ण प्रशासनावर आपली जरब बसवली. ते ( कराड ) फोन करून सांगायचे, याला उचला, 307, 302 च्या गुन्ह्यात अडकवा. हजारो नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. गोदावरी नदीतून रोज 300 ट्रक वाळू काढली जाते. हे ट्रक कुणाचे आहेत?” अस सवाल प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केला आहे.
“या वाल्मिक कराडच्या पाठीमागे सर्व शक्ती उभी करणारे धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असल्यास संतोष देशमुख प्रकरणात कुणालाही न्यायाची अपेक्षा नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढून घ्याव. निपक्षपातीपणाने हा तपास झाला पाहिजे. न्याय मिळाला नाहीतर अतिशय मोठं आंदोलन करण्यात येईल,” असा इशाराही प्रकाश सोळंके यांनी दिला आहे.
हेही वाचा : मोहिनी वाघचे पतीवर गंभीर आरोप; तपासात म्हणाली, “सतीश वाघ यांचे अनैतिक संबंध अन्…”