घरताज्या घडामोडीवंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत अजित पवारांचे महत्वाचे विधान; म्हणाले...

वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत अजित पवारांचे महत्वाचे विधान; म्हणाले…

Subscribe

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षांची राज्यातील महाविकास आघाडी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण येत्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि चित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे एकत्रित येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षांची राज्यातील महाविकास आघाडी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण येत्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि चित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे एकत्रित येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसनेही महाविकास आघाडीच्या विस्ताराला तयारी दर्शवल्याचे पाहायला मिळत आहे. कारण प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आघाडी करण्याचे प्रयत्नही यापूर्वी आम्ही अनेकदा केले होते. दिवंगत आर. आर. पाटील यांनी याविषयी आंबेडकरांशी चर्चाही केली होती. आताही आम्ही त्यांच्याशी चर्चेला तयार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. (ajit pawar on alliance with vanchit bahujan aghadi prakash ambedkar)

“रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, रा. सु. गवई अशा अनेक नेत्यांबरोबर यापूर्वी आम्ही आघाडी करून निवडणुका लढवल्या आहेत. रामदास आठवले हे भाजपच्या सरकारमध्ये मंत्री होईपर्यंत आमच्यासोबतच होते. प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आघाडी करण्याचे प्रयत्नही यापूर्वी आम्ही अनेकदा केले होते. दिवंगत आर. आर. पाटील यांनी याविषयी आंबेडकरांशी चर्चाही केली होती. आताही आम्ही त्यांच्याशी चर्चेला तयार आहोत”, असे अजित पवार यांनी म्हटले.

- Advertisement -

दरम्यान, मुंबईतल्या शिवाजी मंदिर येथे ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर आले होते. तेव्हापासून ठाकरे व आंबेडकर एकीची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा – शेतकऱ्यांवर जलसमाधीची वेळ आणू नका; अजित पवार यांचा राज्य सरकारला इशारा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -