Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Indic Tales : अशा प्रकारचं लिखाण करण्यामागे मास्टरमाइंड कोण? अजित पवारांचा सवाल

Indic Tales : अशा प्रकारचं लिखाण करण्यामागे मास्टरमाइंड कोण? अजित पवारांचा सवाल

Subscribe

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे. लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई पोलिसांना दिलं आहे. यावेळी या आंदोलनात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ उपस्थित होते. महापुरुषांबद्दल सातत्याने बेताल वक्तव्य करणं आणि गरळ ओकण्याचं काम काही वाचाळविरांकड़ून मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. त्यामुळे अशा प्रकारचं लिखाण करण्यामागे मास्टरमाइंड कोण? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.

अशा प्रकारचं लिखाण करण्यामागे मास्टरमाइंड कोण?

अजित पवार यांनी प्रसार माध्यमांनी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ या दोन वेबसाईटवर इतकं खालच्या पद्धतीनं लिखाण करण्यात आलंय की, मी तुम्हाला येथे सांगूही शकत नाही. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या आमच्या प्रेरणास्त्रोत आहोत. आम्ही अनेक महापुरुषांची नाव घेत असतो. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नवीन पिढीने काम करावं. असं आमचं सातत्यानं म्हणणं असतं. त्यासाठी आम्ही सीपींसोबत बोललो आणि त्यांनी या प्रकरणाची दखलही घेतली. अशा प्रकारचं लिखाण करण्यामागे मास्टरमाइंड कोण?, हे लिखाण करण्यासाठी कोणी प्रवृत्त केलं. हे शोधून काढण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली, असं अजित पवार म्हणाले.

बेताल वक्तव्य करणाऱ्यांना शासन झालं पाहिजे

- Advertisement -

महापुरुषांचा अपमान बहुतेक ठिकाणी राज्यकर्त्यांकडूनच केला जातोय. कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवणं हे राज्यकर्त्यांचं काम आहे. राजकीय हस्तक्षेप होऊ न देणं हे त्यांचं काम आहे. पूर्वींच्या राज्यपालांनी ही सुरूवात केली. त्यानंतर आताच्या कॅबिनेट मंत्र्यांनी त्यामध्ये भर घातली. तसेच सत्तेत असणाऱ्या प्रवक्त्यांनी देखील त्यामध्ये भर घातली. हे जे काही सुरूयं. त्याविरोधीत मविआनं मोर्चा देखील काढला होता. बेरोजगारीचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या समस्या या प्रश्नाला महत्त्व देण्याऐवजी हे प्रश्न पुढे आले. त्यामुळे महापुरुषांबद्दल कुणीही आणि वाचाळविरांनी बोलू नये. बेताल वक्तव्य करणाऱ्यांना शासन झालं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.

मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी

घरातल्या मुली शिकत नव्हत्या. त्यामुळे त्या काळात सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाकरिता बाहेर आणलं. मुलगी शिकली तर लक्ष्मी शिकल्यासारखं आहे. आजपर्यंत आपण मुलींच्या कन्या शाळेंना परवानग्या देतो. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आखतो. इतके वर्ष झाल्यानंतर अशा प्रकारचं आक्षेपार्ह लिखाण करायचं आणि महापुरुषांबद्दल गरळ ओकण्याचं काम करायचं. यासंदर्भात तपास लागला पाहिजे. मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे, असंही अजित पवार म्हणाले.

काही महापुरुषांचे पुतळे हटवण्यात आले

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीदिवशी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. दिल्लीत महाराष्ट्र सदन निर्माण करत असताना छगन भुजबळ यांनी खूप मोठं योगदान दिलं आहे. अनेक मान्यवरांचे पुतळे त्याठिकाणी आहेत. योग्य जागा निवडून ते पुतळे आपण तिथे बसवले आहेत. त्यांचा आदर्श कायम डोळ्यासमोर राहण्यासाठी आपण हे केलं आहे. ते आपल्या देशाचे आणि महाराष्ट्राचे दैवत आहेत. परंतु काही महापुरुषांचे पुतळे हटवण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र सदनाकडून अविश्वासार्ह वक्तव्यं करण्यात आलं. त्यामागील आमचा हेतू वेगळा होता. असं महाराष्ट्र सदनाकडून सांगण्यात आलं. मग पुतळा कशाला हलवला?, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.


हेही वाचा : Savitribai Phule : सावित्रीबाई फुलेंची पुन्हा बदनामी, राष्ट्रवादी काँग्रेस


 

- Advertisment -