Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र "राज्यकर्त्यांनी अधिवेशनात पळवाट काढू नये"; अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला

“राज्यकर्त्यांनी अधिवेशनात पळवाट काढू नये”; अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला

Subscribe

अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाला सुरूवात झालीय.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता शिंदे आणि फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे ९ तारखेला राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाला सुरूवात झालीय. राज्यकर्त्यांनी अधिवेशनात पळवाट काढू नये, पळवाट काढण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नावर चर्चा करा, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावलाय.

आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी अनेक मागण्या केल्या आहेत. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पाच आठवड्यांचा करा, अशी मागणी अजित पवार यांनी केलीय. मागील अधिवेशनावेळी कोरोना काळ असल्यामुळे जो जास्त काळ घेता आला नाही, असं देखील अजित पवार म्हणाले. तसंच राज्य सरकारने महिलांचा अपमान करू नये. मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान द्या, असा सल्ला देखील अजित पवार यांनी दिलाय. तसंच अधिवेशनात आमदारांना जनतेचे प्रश्न विचारण्यासाठी संधी द्यावी, असं देखील अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

मराठवाडा मुक्ती संग्रामाचं यंदा अमृतमहोत्सवी वर्ष आहे. हे वर्ष भव्य प्रमाणात साजरं व्हावं, अशी महाराष्ट्रवासीयांची भावना आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं अर्थसंकल्पात ५०० कोटींची घोषणा केली होती. मराठवाडा, महाराष्ट्रातील नागरिकांना, सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामाचं अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करण्यात यावं, मराठवाडा मुक्तीचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत घेऊन जावा, हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे, असंही अजित पवार म्हणाले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -