घरताज्या घडामोडीराज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय दुसरे काय जमते? - अजित पवार

राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय दुसरे काय जमते? – अजित पवार

Subscribe

पुणे । मिमिक्रीशिवाय दुसरे जमते काय, असा सवाल उपस्थित करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला. त्यांनी रविवारी प्रसारमाध्यमांना सांगितले की, मिमिक्री करणे हा राज ठाकरे यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वत:चा पक्ष वाढवण्यापेक्षा त्यांना अजित पवार यांची मिमिक्री करणे, अजित पवार यांचे व्यंगचित्र काढणे यामध्ये जर समाधान वाटत असेल, तर माझ्या राज ठाकरेंना शुभेच्छा आहेत.

राज ठाकरे यांना मिमिक्रीशिवाय दुसरे काय जमते. मिमिक्री करणे हा राज ठाकरे यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यांना जनतेने नाकारले आहे. शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर त्यांचे १४ आमदार निवडून आले होते. नंतर एक आमदार निवडून आला. जुन्नरच्या शरदराव सोनवणे यांनी मागच्या विधानसभेमध्ये त्यांच्याकडून तिकीट घेतले म्हणून मनसेचा एक आमदार त्यावेळी निवडून आला.

- Advertisement -

नंतर २०१९ मध्ये कल्याणच्या आमच्या सहकार्‍यांनी त्यांची पाटी लावली म्हणून पुन्हा एकदा एक आमदार आला. त्यांना स्वत:चा पक्ष वाढवण्यापेक्षा अजित पवारची मिमिक्री करणे, अजित पवारचे व्यंगचित्र काढणे यामध्ये जर समाधान वाटत असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा, असे पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -