चिठ्ठी आयी है.., कार्यकर्त्याची चिठ्ठी येताच भरसभेत अजित पवारांनी गुणगुणलं गाणं

ajit pawar

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी उस्मानाबादमध्ये रोखठोक भाषण केलं. ज्या पद्धतीने ते रोखठोक भाषण करतात. तितकेच कार्यकर्त्यांसोबत मजा मस्करी देखील ते करतात. परंतु भाषण करत असताना एका कार्यकर्त्याने त्यांना भरसभेत चिठ्ठी दिली पाठवली. तेव्हा अजित पवार भरसभेतच म्हणाले की, ए द्या रे त्याची चिठ्ठी द्या. ही चिठ्ठी अजित पवारांपर्यंत पोहोचेपर्यंत चिठ्ठी आयी है, आयी है असं गाणं त्यांनी गुणगणलं. त्यामुळे सभेत एकच हशा पिकला.

उस्मानाबादमध्ये अजित पवारांचं भाषण सुरु असताना कोणीतरी तक्रारपर चिठ्ठी पाठवली. ही चिठ्ठी पाठवताना चुळबूळ झालेली पाहून अजित पवार मंचावरून ओरडले. नंतर ते म्हणाले की, उस्मानाबादमध्ये अजित पवारांचं भाषण सुरु असताना कोणीतरी तक्रारपर चिठ्ठी पाठवली. ए द्या रे त्याची चिठ्ठी द्या. चिठ्ठी अजित पवारांपर्यंत पोहोचेपर्यंत त्यांनी गाणं गुणगुणायला सुरुवात केली. पवारांनी तक्रारीची दखल घेत कार्यकर्त्याला आश्वस्त केलं.

मी लक्ष घालतो, मी साखर आयुक्तांशी पण बोलतो. हे चुकीचं आहे, राणाचा असो किंवा कोणाचाही असो कारखाना, भाव दिलाच गेला पाहिजे, असे पवार म्हणाले. एकंदरीत अजित पवारांच्या भाषणावरून साखरेच्या हमीभावावरुन कार्यकर्त्याची तक्रार असल्याचे समजते.

काही लोकांना एवढी मस्ती आली आहे की, त्यांना सत्तेची नशा चढली आहे. आपण काय करतोय, काय बोलतोय.. आरे ला कारे करा, यासाठी तुम्ही सत्ता घेतली का रे बाबांनो?, असं म्हणत शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांवर पवारांनी टोला लगावला.


हेही वाचा : मल्लिकार्जुन खर्गेंनी सोडलं विरोधी पक्षनेतेपद, सोनिया गांधींकडे सुपूर्द केला