संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहीलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीवर असून राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार हे निश्चित आहे. यामुळे विजयी उमेदवारांवर कौतुकाचा वर्षाव सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका टि्वटने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. या टि्वटमध्ये अजित पवार यांनी गुलाबी जॅकेटवरून त्यांची खिल्ली उडवणाऱ्यांना ‘सबका बदला लेगारे मैं ‘असे पुष्पा स्टाईलने उत्तर दिले आहे.अजित पवारांचे हे टि्वट व्हायरल झाले असून दादांचा नेमका रोख कोणाकडे आहे यावर कयास लावले जात आहेत.
यंदाची विधानसभा निवडणूक ही महायुती आणि मविआसाठी प्रतिष्ठेची मानली गेली होती. यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारसंघात प्रचारांचा धडाका लावला होता. पण यात अजित दादांसाठी ही निवडणुक थेट बहीण खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधातच असल्याने त्यांची पुरती गोची झाली होती. यावेळी प्रचारात कुटुंबाविरोधात लढावं लागत असल्याने अजित दादा अनेकवेळा हळवे झाल्याचेही पाहावयास मिळाले.
Maharashtra Chooses Pink 🙏🏻#MaharashtraElectionResult pic.twitter.com/0LqcGWwh3A
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 23, 2024
पण यादरम्यान त्यांच्या भाषणापेक्षा सगळ्यांचे लक्ष वेधले ते त्यांच्या गुलाबी जॅकेटने. त्यावरून महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची खिल्लीही उडवली होती.याची सल दादांच्या मनात होती. त्याचाच वचपा त्यांनी टि्वटमधून काढला असल्याचे बोलले जात आहे. आपल्या टि्वटमध्ये दादा यांनी म्हटले आहे की महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला असे सांगत दादांनी ट्रोलर्सला सुनावले आहे. यात अजित दादांच्या सोशल मीडियाचे काम पाहणाऱ्या नरेश अरोरा यांचे गुलाबी फूल ेदऊन अभिनंदनही केले आहे.