Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी मुलीला चौथ्या मजल्यावर एकटचं का ठेवलं? अजित पवारांचा सवाल

मुलीला चौथ्या मजल्यावर एकटचं का ठेवलं? अजित पवारांचा सवाल

Subscribe

चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतीगृहात १९ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेत सापडल्याने बलात्कार आणि हत्येचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात असून राजकीय वर्तुळातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत मुलीला चौथ्या मजल्यावर एकटचं का ठेवलं? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) उपस्थित केला.

ही मुलगी चौथ्या मजल्यावर एकटीच राहत होती

अजित पवारांनी मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस स्थानकाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, जी घटना मुलीबाबत घडली. तिचे आई-वडील त्यांच्या गावावरून आले आहेत. त्यांचा मुलगा सुद्धा येथे आला आहे. मुलाला पुण्यातील औंध येथे आयटीआयमध्ये प्रवेश मिळाला. तिथे त्याने त्याचा डीप्लोमा कोर्स पूर्ण केला आणि मुलगी येथे शिक्षण घेत होती. ४५० मुलींची व्यवस्था असणारं हे सावित्रीबाई फुले वसतीगृह आहे. परंतु याठिकाणी १० टक्केचं मुली राहतात. पण ही मुलगी चौथ्या मजल्यावर एकटीच राहत होती. वास्तविक ४५० मुली वसतीगृहात राहत असताना सगळ्याचं मुलींना एका मजल्यावर ठेवता आलं असतं. पण त्याबद्दलचं कारण काय?, या प्रकरणी पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे. परंतु आरोपीने स्वत: रुळावर जाऊन आत्महत्या केल्यामुळे सर्वच प्रकारचे पुरावे नष्ट झाले.

तपास पारदर्शक पद्धतीने झाला पाहिजे

- Advertisement -

ही व्यक्ती ज्या ठिकाणी राहत होती. त्या व्यक्तिला सरकारनं नेमलेलं नव्हतं. परंतु ती तिथे राहत होती. अनेक मुलींचे त्याला काही कामानिमित्त फोन असायचे. कदाचित त्याने मुलींकडून विश्वास संपादन केला असेल. अनेक प्रकारचे फोनवरून संभाषण सुद्धा झाले आहेत. परंतु नेमके काय आहेत, हे अद्यापही अस्पष्ट आहे. या प्रकरणाचा तपास पारदर्शक पद्धतीने झाला पाहिजे असं पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं आहे, असं अजित पवार म्हणाले.

निष्पाप मुलीला न्याय मिळाला पाहिजे

आमच्या मुलीला चौथ्या मजल्यावर एकटचं का ठेवलं?, असा प्रश्न तिच्या आई-वडीलांना देखील पडला आहे. ८ जूनला ही मुलगी पुन्हा आपल्या घरी जाणार होती. कारण तिच्या परीक्षा ५ जूनला संपल्या होत्या. एवढ्या मोठ्या रहदारिच्या रस्त्यावर, ज्याठिकाणी व्हीव्हीआयपी लोकांचं सारखं येणं-जाणं असतं. शिवाय पोलीस खात्याचे सहकारी सुद्धा याच ठिकाणाहून या-जा करतात. परंतु असं असताना देखील अशा प्रकारच्या घटना घडतात. त्यामुळे या प्रकरणाचा तपास लागला पाहिजे आणि त्या निष्पाप मुलीला, तिच्या आई-वडीलांना न्याय मिळाला पाहिजे, अशी माझी मागणी आहे, असंही पवार म्हणाले.

- Advertisement -


हेही वाचा : दलितांना जीव नाही का? जितेंद्र आव्हाडांचा मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांना सवाल; राज्यभर आंदोलनाचा इशारा


 

- Advertisment -