घरताज्या घडामोडीआदित्य ठाकरेंनी गाडीचं सारथ्य केल्यानं राजकीय अर्थ काढण्याचे कारण नाही, युतीबाबत अजितदादांचे...

आदित्य ठाकरेंनी गाडीचं सारथ्य केल्यानं राजकीय अर्थ काढण्याचे कारण नाही, युतीबाबत अजितदादांचे स्पष्ट उत्तर

Subscribe

महाविकास आघाडी हे तीन पक्षांचे सरकार आहे. यामध्ये काही मित्र पक्षांचा पाठींबा आहे त्यामुळे युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल. त्याबाबत चर्चा करण्याचे कारण नाही असे अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले आहे.

उमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विकासकामांची पाहणी केली. आदित्य ठाकरेंच्या गाडीतून अजितदादांनी प्रवास केला आणि गाडी स्वतः आदित्य ठाकरे चालवत होते. दोन्ही नेत्यांमधील जवळीक वाढली असल्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युती करणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान गाडी चालवली म्हणून राजकीय अर्थ काढायचे काही कारण नाही अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. प्रत्येकाला गाडी चालवण्याची आवड असते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुद्धा गाडी चालवतात. युतीबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल असे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबईतील धोबी घाट, महालक्ष्मी रेस कोर्स आणि माहिममधील विकासकामांची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी केली आहे. शुक्रवारी सकाळीच हा पाहणी दौरा करण्यात आला. पाहणी दौऱ्यात कोणताही व्यथ्यय नको यासाठी कोणाला याबाबत माहिती देण्यात आली नव्हती असे अजित पवार यांनी सांगितले. या पाहणी दौऱ्यादरम्यान अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांचा एकाच गाडीतून प्रवास आणि आदित्य ठाकरेंनी गाडी चालवली याची अधिक चर्चा होत आहे. यावरुन आता युतीबाबतचा अर्थ काढण्यात येत आहे. परंतु अजितदादांनी युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

- Advertisement -

शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये युती होईल अर्थ काढू नका

युतीच्या चर्चेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर अजित पवार म्हणाले की, आदित्य ठाकरेंनी गाडी चालवली याचा राजकीय अर्थ काढण्याचे कारण नाही. प्रत्येकाला गाडी चालवण्याची आवड असते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुद्धा मातोश्रीवरुन निघाल्यावर वर्षापर्यंत गाडी चालवत येत असतात. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये युती होईल असे काही अर्थ काढू नका, महाविकास आघाडी हे तीन पक्षांचे सरकार आहे. यामध्ये काही मित्र पक्षांचा पाठींबा आहे त्यामुळे युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल. त्याबाबत चर्चा करण्याचे कारण नाही असे अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले आहे.

आदित्य ठाकरेंनी चांगलं काम केलं

महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र काम करण्याचे ठरवले आहे. ज्या ठिकाणी चांगलं काम झालंय तसेच इतर जिल्ह्यांमध्ये करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंसह विकासकामांची पाहणी करण्यासाठी आलो आहे. आदित्य ठाकरेंनी चांगलं काम केलं असून त्यांच्या संकल्पनेतून अनेक उपक्रमक राबविण्यात आले आहेत. विकासकामे सुरु असताना झाडांना धक्का लागणार नाही याची विशेष काळजी घेण्यात येतेय आणि याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचाही आग्रह असतो असे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : …अन् आदित्य ठाकरेंकडून अजितदादांसाठी स्टेअरिंग हातात घेत गाडीचं सारथ्य

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -