घरमहाराष्ट्रगुजरातमध्ये निवडणुका मग महाराष्ट्रातील कामगारांना सुट्टी का? अजित पवारांचा सवाल

गुजरातमध्ये निवडणुका मग महाराष्ट्रातील कामगारांना सुट्टी का? अजित पवारांचा सवाल

Subscribe

गुजरात विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे म्हणून राज्य सरकारने 1 ते 5 डिसेंबर रोजी पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र या निर्णयावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. गुजरातमध्ये निवडणुका मग महाराष्ट्रातील कामगारांना सुट्टी का? असा प्रत्यक्ष सवाल आज अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. (ajit pawar reaction on maharashtra worker leave for gujarat election 2022 )

अजित पवार म्हणाले की, सरकारने काय करावं हा सरकारचा निर्णय आहे परंतु शेजारच्या राज्यात निवडणूक आहे, त्यामुळे आपल्या राज्यातील काही ठरावीक जिल्ह्यात सुट्टी हे पहिल्यांदा पहिले आहे. दर पाच वर्षांनी निवडणूका येतात, पण मला नाही आठवत की, राज्य सरकारमध्ये काम करत असताना सुट्ट्या दिल्या. आम्ही 15 वर्षे सत्तेत होते. त्यावेळी मध्यप्रदेश, गोवा आणि कर्नाटकात निवडणुका झाल्या. मात्र आम्ही कधी अशी पगारी सुट्टी दिली नाही.

- Advertisement -

देशाच्या पार्लमेंटच्या निवडणूक असताना सर्वांना सुट्टी देणं एकवेळ समजू शकतो. पण अशाप्रकारे आदेश पाहिल्यादाचं पाहायला मिळाले, पगारी सुट्टी दिली, अशाप्रकारे पायंडे पडले जात असतील तर ते चुकीचे आहे. अस अजित पवार म्हणाले.

पगारी, आजारी अशाप्रकारच्या पावणेदोनशेहून अधिक सुट्ट्या अशाप्रकारे सुट्टी दिली जात आहे. राज्याचा गाढा हाकताना अधिकारी, कर्मचारी 6 महिने सुट्टीवर जात असेल तर काम कस होणार आहे? आज 365 दिवसांपैकी सर्व प्रकारच्या सुट्ट्या पकडून पगारी, आजारी अशा जवळपास पावणे दोनशेहून अधिक सुट्ट्या दिल्या जातात. त्यामुळे याचा आपण कुठं गांभीर्याने विचार केला पाहिजे, राज्याचा गाडा हाकताना अधिकारी सहा महिने पगारी सुट्टी घेत असेल आणि उर्वरित सहा महिने काम करत असेल, तर हा जनतेचा टॅक्स रुपाने आलेला पैशांचा गैरवापर आहे, असेही ते म्हणाले.


सांस्कृतिक डोंबिवलीत वाढणार वाचन संस्कृती; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचा श्रीगणेशा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -