बँका चालवणं स्पर्धात्मक, पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया

ajit pawar slams medical stores vendor in corona test kit Note
मेडिकलवाल्यांना नोटा मोजायला वेळ कसा मिळतो?, अजितदादांनी कोरोना टेस्ट कीटवरुन फटकारलं

पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांच्या निवडीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बँका चालवणं हे सुद्धा स्पर्धात्मक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. १९९१ पासून माझा आणि दिलीप वळसे-पाटीलांचा या बँकेशी संबंध आलेला आहे. तेव्हापासून आम्ही संचालकपदाचं काम करत आहोत. वास्तविक यावेळेस आम्ही दोघेही उभे राहणार नव्हतो. परंतु काही कारणामुळे नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागला. एकंदरीत आम्ही तिथून फॉर्म भरला नसता तर आमच्यामध्ये एकवाक्यता झाली नसती. बारामती आणि आंबेगाव तालुक्यात आम्हाला एक वाक्यता ठेवायची होती. मी बराच प्रयत्न केला. परंतु त्याला यश आलं. जिल्हातील शेतकऱ्यांसाठी ही बँक अतिशय महत्त्वाची आहे. त्यासाठी चांगल्या पद्धतीने संचालक बोर्ड येथे यावं आणि चांगलं काम करावं ही त्यामागील भावना होती. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांकडून एखाद अपवाद वगळता एका प्रकारच्या विचारांची लोकं निवडुन आली आहेत, असं अजित पवार म्हणाले.

दोघांनाही एकमताने संधी देण्याचं काम

अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, पुरंदर तालुक्यातून निवडून आलेले दिगंबर दुर्गाडे यांना अध्यक्ष म्हणून संधी देण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच बँकेत निवडुन आलेले सुनील चांदेरे हे मुळशी तालुक्यातून अ वर्गाचं प्रतिनिधित्व करतात. तर ओबीसी मतदारसंघातून ड वर्गाचं दुर्गाडे प्रतिनिधित्व करतात. अशा प्रकारे दोघांनाही एकमताने संधी देण्याचं काम सर्वांनी केलं आहे, पवार म्हणाले.

बँका चालवणं हे सुद्धा स्पर्धात्मक

पुढे अजित पवार म्हणाले की, बँका चालवणं हे सुद्धा आता स्पर्धात्मक झालंय. कारण विविध प्रकारच्या बँकेची नियमावली जारी केली जात आहे. त्या नियमावलीचं तंतोतंत पालन करून कर्ज पुरवठा, शेतकरी, सहकारी संस्थांना आणि पतसंस्थांना अशा वेगवेगळ्या प्रतिनिधींचं नेतृत्त्व करणारी व्यक्ती सभासद असतात. त्यांना देखील कर्ज देत असताना या सगळ्यांचा आता विचार दिगंबर दुर्गाडे आणि सुनील चांदेरे करतील. तसेच त्यांना सर्व बोर्ड मनापासून पाठिंबा देईल.

पारदर्शक कारभार करणं महत्त्वाचं आहे. कुठेही चुकीची गोष्ट करता कामा नये. कागदपत्राची पुर्तता असेल आणि जे धोरण असेल तर कोणत्याही गटाचा, तटाचा आणि पक्षाचा, जातीचा, धर्माचा न बघता त्याला मदत झा्ली पाहीजे. पुणे जिल्हा बँकेंची अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा ही टिकवा, अशा पद्धतीचं आवाहन आम्ही त्यांना केलंय.


हेही वाचा : पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाबाबत दिलीप वळसे पाटलांसह अंतिम निर्णय घेणार, अजित पवारांची माहिती