घरताज्या घडामोडीराष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला, राज ठाकरेंच्या विधानावर अजितदादांचे रोखठोख उत्तर

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला, राज ठाकरेंच्या विधानावर अजितदादांचे रोखठोख उत्तर

Subscribe

शरद पवार साहेबांनी कायमच पुरोगामी विचार मांडले आहेत. हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती - अजित पवार

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद वाढला असल्याचे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी काही दिवसांपुर्वी केलं होतं. राज ठाकरेंच्या आरोपावर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. लोकं काहीतरी बोलून जातात त्यांच्या बोलण्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषदेदरम्यान राज ठाकरेंना टोला लगावला होता. अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा बैठक घेतली होती या बैठकी नंतर माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांना राज ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला, अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला असल्याचा आरोप केल्याबाबत प्रश्न विचारला गेला. शरद पवार साहेबांनी कायमच पुरोगामी विचार मांडले आहेत. हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. कधी तरी काही लोकं असं बोलून जातात, मात्र त्याला महत्त्व देण्याचं कारण नाही अशा शब्दात राज ठाकरेंचं नाव न घेता अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -

शरद पवार यांचा राज ठाकरेंवर निशाणा

राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “त्यांच्यावर न बोललेलंच बरं, त्यांनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे” असा सल्ला शरद पवार यांनी राज ठाकरेंना दिला आहे.

राज ठाकरेंचा थेट राष्ट्रवादीवर आरोप

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. यावेळी राज ठाकरे यांना हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरु झालं आहे का? असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. यावर राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाला आहे. कोण जेम्स लेन, कसलं पुस्तक लिहिलं? तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता. बरं तो आता कोण आहे आणि कुठे आहे? त्या सगळ्या वातावरणात मराठा समाजाच्या मुलांना, मुलींना, हे कोणी लिहिले तर ब्राम्हणांनी लिहिले मग माळी समाज मग इतर समाज हे सगळं रचलेलं आहे. असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : …त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी पहिली हिंदुत्वाची हाक दिली, राज ठाकरेंनी सांगितला किस्सा


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -