घरताज्या घडामोडीअमोल मिटकरींच्या वक्तव्यावर अजित पवारांचा संताप, म्हणाले बोलताना तारतम्य...

अमोल मिटकरींच्या वक्तव्यावर अजित पवारांचा संताप, म्हणाले बोलताना तारतम्य…

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी विरुद्ध अखिल ब्राम्हण महासंघ असा वाद सुरु झाला आहे. ब्राम्हण महासंघाने राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून पुण्यात आंदोलनसुद्धा करण्यात आले आहे. अमोल मिटकरींनी माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला आहे. आपण माफी मागणार नसल्याचे यापूर्वीच अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर अजित पवार चांगलेच संतापले. माझं नेहमी स्पष्ट मत असते आणि ते तुम्हा सर्व माध्यमांनासुद्धा माहिती आहे. मला नेहमी तुमच्याकडून विचारण्यात येते की, याने असं वक्तव्य केलं तसं वक्तव्य केलंय तुमचे त्यावर मत काय? व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षातील असो परंतु ज्याने त्याने आपले मत व्यक्त करताना कोणत्याही समाजाच्या भावना आणि समजाचा अवमान होणार नाही याचे तारतम्य ठेवून वक्तव्य केलं पाहिजे. अशा शब्दात अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले होते?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीतील आयोजित पक्षाच्या परिवार संवाद मेळाव्यात व्यासपीठावरुन भाषण केल. यावेळी त्यांनी अनेक किस्से आणि गंमतीदार गोष्टी सांगितल्या. राजकीय नेत्यांची नक्कलसुद्धा त्यांनी केली. परंतु एक किस्सा सांगितला त्यावरुन अखिल ब्राम्हण महासंघाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मिटकरी म्हणाले की, मी एका ठीकाणी गेलो होतो मुलीचा बाप म्हणाला साहेब बसा कन्यादान आहे. यावर मी म्हटलं अन्नदान ऐकलं, कन्यादान ऐकलं, रक्तदान ऐकलं, कन्या काय दान करण्याचा विषय असतो का? नाही म्हणे असतो आम्हाला शिकवल आहे. तुम्ही बसा असे म्हटल्यावर मी खुर्चीवर बसलो.

नवरदेव पीएचडी, नवरी एमए झाली होती असे मिटकरी म्हणाले. यांनतर लग्नाचे विधी सुरु झाले. लग्न लावणारे गुरुजी(ब्राम्हण) सांगतात डोळ्याला पाणी लावा, गुरुंजींच्या शैलीत मिटकरी पुढे सांगितले, तुमचा हात माझ्या हातात घ्या असे म्हणताच व्यासपीठावरील मंडळी आणि श्रोते हसू लागले. मिटकरींनी पुढे सांगितले, आचमन करा, धुपम दिपम नमस्कारम, मम भार्या समर्पयामि असे मिटकरी म्हणाले. मी नवरदेवाच्या कानात सांगितले. अरे येड्या ते महाराज म्हणाले की, मम म्हणजे माझी, भार्या म्हणजे बायको, समर्पयामि म्हणजे घेऊन जा, आररर कधी सुधारणार आपण असे मिटकरी म्हणताच सर्व जोरात हसू लागले. परंतु मिटकरींच्या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : अमोल मिटकरींचं तीन शब्दांत ट्वीट, विरोधकांना दिलं उत्तर

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -