घरताज्या घडामोडीकेंद्रीय यंत्रणांना कारवाईचा अधिकार पण गैरवापर होऊ नये, अजित पवारांची ईडीच्या छापेमारीवर...

केंद्रीय यंत्रणांना कारवाईचा अधिकार पण गैरवापर होऊ नये, अजित पवारांची ईडीच्या छापेमारीवर प्रतिक्रिया

Subscribe

यापूर्वी काही लोकांनी आता आमक्याचा नंबर आणि तमक्याचा नंबर असल्याचे सूतोवाच केले होते असं म्हणत अजित पवारांनी भाजप नेते किरीट सोमय्यांना टोला लगावला आहे.

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यासंबंधित ७ ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. परब यांच्या शासकीय आणि खासगी निवासस्थानीसुद्धा छापेमारी करण्यात आली आहे. परब यांच्यावर कोणत्या कारणामुळे कारवाई करण्यात येत आहे. याबाबत माहिती समोर आली नाही. केंद्रीय यंत्रणांना कारवाई करण्याचे अधिकार आहेत. त्या अधिकाऱ्यांचा गैरवापर होऊ नये अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याही नातेवाईकांवर आयकर विभागाने छापेमारी केली होती. त्यांना तसा अधिकार होता त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. परंतु आतासुद्धा ईडीने राज्यात छापेमारी केली असल्याची माहिती मला मिळाली आहे. कोणत्या कारणास्तव छापेमारी करण्यात आली याबाबत माहीती देण्यात आली नाही. यापूर्वी काही लोकांनी आता आमक्याचा नंबर आणि तमक्याचा नंबर असल्याचे सूतोवाच केले होते असं म्हणत अजित पवारांनी भाजप नेते किरीट सोमय्यांना टोला लगावला आहे. काही लोकं बोलतात आणि त्यानंतर तशा पद्धतीने घडत असतं. या यंत्रणांमध्ये अशा प्रकारे कोणाचाही हस्तक्षेप न होता पारदर्शकपणे तपास करण्याच्या करता कोणाचा नकार नाही असे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान अजित पवार पुढे म्हणाले की, जसं anti corruption bureau आणि ईओडब्लू, सीआयडी राज्य सरकारच्या हातात आहे. त्याच्याही संदर्भात कोणत्या तक्रारी आल्या तर राज्य सरकारच्या यंत्रणा कारवाई करु शकते. तसेच केंद्रीय यंत्रणासुद्धा कारवाई करु शकते. तो अधिकार कायद्याने दिला आहे. परंतु त्याचा गैरवापर होऊ नये अशी माफक अपेक्षा सर्वांची असते.

केंद्राच्या यंत्रणांना राज्याच्या यंत्रणांना चौकशी करण्याचा अधिकार आहे. त्या चौकशीचा गैरवापर केंद्राने आणि राज्य सरकारने केला नाही पाहिजे. माहिती असेल तर त्यानुसार कारवाई करावी. राष्ट्रवादीच्या काही सहकाऱ्यांसंबंधात काही नेत्यांवर कारवाई झाली आहे. शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाई होत आहे. महापालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्षांवर कारवाई झाली आहे. कारवाईमध्ये पारदर्शकता असावी असे अजित पवार म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार?, सचिन वाझे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात माफीचा साक्षीदार होणार

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -