तुम्ही कितीही टाळ्या वाजवा आता मी अजिबात चुकणार नाही, अजित पवारांना आठवलं धरणाबाबतचं वक्तव्य

भाषण सुरु असताना त्यांची गाडी पटली सोडते आणि मग ते कार्यकर्त्यांवर किंवा अधिकाऱ्यांवर चांगलेच तोंडसूख घेतात. अशीच एक टीका अजित पवारांच्या पुन्हा लक्षात आली आणि त्यांनी आता अजिबात चुकणार नाही असे म्हटलं आहे.

Ajit Pawar said that he will withdraw the charges in the Punatamba agitation case

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आपल्या रोखठोक बोलण्याच्या शैलीमुळे ओळखले जातात. अजित पवार यांना याच शैलीमुळे टीकेलासुद्धा समोरे जावे लागले आहे. धरणांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवारांवर प्रचंड टीका करण्यात आली होती. तसेच अजित पवार भाषणादरम्यान अधिकारी आणि कार्यकर्त्यांनासुद्धा फैलावर घेत असतात. यावेळी पुन्हा एकदा अजित पवारांना धरणाबाबत वक्तव्य आठवलं आहे. आता मी पुन्हा चूकणार नाही. तुम्ही कितीही टाळ्या वाजवल्या तरी मी अजिबात चुकणार नाही असे अजित पवार म्हणाले आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता भाषणादरम्यान बोलताना नेहमीच सूचक वक्तव्य करत असतात. त्यांनी अनेक भाषणामधून नेत्यांवर आणि विरोधकांवर टीका केली आहे. तसेच अधिकाऱ्यांवरही जाहीर सभेतून निशाणा साधला आहे. नुकतेच त्यांनी सोलापूर मंत्री दत्ता भरणेंबाबत वक्तव्य केलं होतं. तर यापूर्वी धरणांबाबत अजित पवारांनी केलेलं वक्तव्य चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

अजित पवार आपल्या विनोदी शैलीत भाषण करतात. भाषण सुरु असताना त्यांची गाडी पटली सोडते आणि मग ते कार्यकर्त्यांवर किंवा अधिकाऱ्यांवर चांगलेच तोंडसूख घेतात. अशीच एक टीका अजित पवारांच्या पुन्हा लक्षात आली आणि त्यांनी आता अजिबात चुकणार नाही असे म्हटलं आहे.

अजित पवारांना आठवलं धरणांबाबतचं वक्तव्य

उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या भाषणादरम्यान कार्यकर्ते त्यांना टाळ्या वाजवून चांगलीच दाद देत होते. यावर अजितदादा म्हणाले, अता मी अजिबात चुकणार नाही. आता चुकायच नाही, लय खबरदारी घेतोय, मागे एकवेळा चुकलो तर सकाळी 7 पासून यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळावर बसलो होतो. यामुळे आता चुकायचं नाही असे अजित पवार म्हणाले. तसेच कितीही टाळ्या वाजवा मी काही बोलणार नाही. कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजववल्या तर भावनेच्या भरात चुकीचे बोलून जातात परंतु मी आता दुसऱ्या मनाला सांगत असतो चुकायचं नाही. चुकायचं नाही असे अजित पवार यावेळी म्हणाले.


हेही वाचा : राज्यसभेच्या निवडणुकीची चुरस वाढली, काँग्रेस, भाजप आणि सेनेच्या बैठकांवर बैठका, काय होणार?