घरमहाराष्ट्रAjit Pawar : राष्ट्रवादींच्या युवतींमधील नाराजी अजित पवारांनीच केली उघड, मंत्री आदिती...

Ajit Pawar : राष्ट्रवादींच्या युवतींमधील नाराजी अजित पवारांनीच केली उघड, मंत्री आदिती तटकरेंना दिला आदेश

Subscribe

रायगड : कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबिर पार पडत आहे. या शिबिराचा आजचा दुसरा दिवस आहे. या शिबिरामध्ये अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून भाष्य करत उपस्थित पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना आणि पक्षातील सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांना सूचना केल्या. यावेळी अजित पवारांनी मंत्री आदिती तटकरे यांना सल्ला दिला आहे. तर राष्ट्रवादींच्या युवतींमध्ये असलेली नाराजी दूर करून त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याची गरज असल्याचे अजित पवारांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे अजित पवार गटांत नाराजी असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलेल्या आहेत.
(Ajit Pawar revealed the displeasure of NCP girls, ordered Minister Aditi Tatkare)

हेही वाचा – Ajit Pawar : देशाचं सांगू शकत नाही पण…; ‘दादां’चे प्रकाश आंबेडकरांच्या भाकितावर भाष्य

- Advertisement -

यावेळी अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादीच्या युवतींनी मिळून नवीन अभियान सुरू केले आहे. आदिती तटकरे त्यांना मदत करत असते. त्यांना या सर्व बाबतीत मार्गदर्शन करण्याचे कामही आदिती तटकरे करत असतात. पण यावेळी मला आदिती यांना सांगायचे आहे की, तुमच्यावर जबाबदारी आहे. त्यामध्ये कमी काळामध्ये बरीच कामे करायची आहेत. राष्ट्रवादी युवतीमध्ये जरा समन्वय साधण्याची गरज आहे. यांच्यात काही वाद आहेत, असे म्हणता येणार नाही. पण मतभेद आहेत. काही वेगवेगळी मते आहेत. त्यांना एकत्र घेऊन बसण्याची आणि त्यांच्यासोबत काम करण्याची गरज आहे. आदिती यांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. युवतींना मार्गदर्शन करण्याचे आणि एकंसघ करण्याचे काम करावे लागेल. मुलींना याबाबतचे मार्गदर्शन मिळाले तर युवा पदाधिकारी असलेल्यांना काय काम कसे करायचे आहे, याबाबतची माहिती मिळेल. ही पूर्ण जबाबदारी आदिती तटकरे यांच्यावर देण्यात येईल, असेही अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

तर, आदिती तटकरे या संपूर्ण मंत्रिमंडळात महिलांचे एकट्या नेतृत्व करत आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांच्यावर महिला व बालविकास खात्याचीही जबाबदारी आहे. त्यामध्ये इतर पण बालक आले आणि बाकीचे पण आले. त्यांना यासाठी बजेट देखील चांगला देण्यात येत असतो, त्यामुळे काही कमी पडत असेल तर त्यातही वाढ करून देण्यात येईल. पण मुलांना, महिलांसाठी आखण्यात आलेल्या योजनांमध्ये कोणतीही कमी पडू नये याचा प्रयत्न केला जाईल, असेही अजित पवार यांच्याकडून मंथन शिबिराच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

यावेळी अजित पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि विशेषतः फ्रंटलच्या अध्यक्षांना मंत्रालयासमोरील पक्ष कार्यालयात येऊन न बसता राज्यात फिरावे, असे आवाहन केले आहे. तसेच, विविध संघटनांनी एकत्र आले पाहिजे. संघटनांनी जनतेशी संपर्क वाढवला पाहिजे. सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून पक्ष वाढीचे काम केले पाहिजे. कारण पक्ष हा केवळ भाषणे देऊन नाही तर मेहनत करून वाढत असतो. त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि कार्यकर्त्याने, नेत्यांने, मंत्र्याने आपापल्या विभागातील पक्ष कार्यालयात जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साझला पाहिजे. त्याशिवाय ज्या काही नियुक्त्या आता बाकी आहेत, त्या नियुक्ता 30 डिसेंबरपर्यंत कराव्यात, अन्यथा त्या सेलच्या प्रमुखाची उचलबांगडी करून त्या सेलची जबाबदारी दुसऱ्याला देण्यात येईल, असे थेट अजित पवारांकडून या भाषणातून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -