Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र पुणे पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत अजित पवार म्हणाले, 'तुझ्या तोंडात साखर पडो...'

पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत अजित पवार म्हणाले, ‘तुझ्या तोंडात साखर पडो…’

Subscribe

पुणे : “तुझ्या तोंडात साखर पडो”, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांच्या पालकमंत्री प्रश्नावर उत्तर देताना केले. अजित पवारांच्या प्रत्युत्तराने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात पुण्याच्या पालमंत्री पदासंदर्भाच चर्चा रंगू लागल्या. पुण्यात आज गणेश मंडळासोबत अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार आणि चंद्रकांत पाटील दोघेही एकत्र आले होते.

तुम्हाला सगळे पुणेकर सुपर पालकमंत्री म्हणून बघताय, पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “तुझ्या तोंडात साखर पडो”, असे म्हटल्यानंतर उपस्थितामध्ये हशा पिकला. अजित पवारांनी हे पालकमंत्री होण्यास अतुर असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेससोबत अजित पवार यांनी बंडखोरी करत 2 जुलै रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतल्याने राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. अजित पवार महायुतीत सामील झाल्यानंतर शिंदे गटात नाराजी असल्याच्या अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होता. आता अजित पवार सत्तेत आल्यानंतर ही पुण्याचे पालकमंत्री पद त्यांच्या जाणार का?यावर अनेक तर्कवितर्क सुरू झाले होते.पण अद्यापही चंद्रकांत पाटील हेच पुण्याचे पालकमंत्री आहेत.

‘मविआ’ काळात अजित पवार पुण्याचे पालकमंत्री

- Advertisement -

महाविकास आघाडीच्या काळात अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री होते. यावेळी अजित पवारांवर चंद्रकांत पाटील यांनी अनेकदा टीका केली होती. यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी पक्षासोबत बंडखोरी करत भाजपशी हात मिळवणी केली. यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आले. या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील यांना पुण्याचे पालकमंत्री पद मिळाले. पण आता अजित पवार महायुतीत सामील झाल्यानंतरही पुण्याचे पालकमंत्री हे चंद्रकांत पाटील आहे. पण अजित पवारांना पुण्याचे पालकमंत्री पद हवे असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्या.

हेही वाचा – छगन भुजबळांचे नाव न घेता अजित पवार म्हणाले; “राजकीय भूमिका मांडताना…”,

ध्वजारोहणावरून राजकारण

- Advertisement -

राज्यात 15 ऑगस्टला प्रत्येक जिल्हाचे पालकमंत्री हे ध्वजारोहणावरुन करतात. यंदाच्या ध्वजारोहणाच्या मुद्द्यावरून राज्यात मोठे राजकारण तापले दिसून आले. राज्य सरकारने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत पुण्यात चंद्रकांत पाटील ध्वजारोहण करणार होते. यामुळे अजित पवार नाराजी व्यक्ती केली. यावेळी अजित पवारासोबत छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ हे देखील नाराज होते. यानंतर अजित पवारांच्या दबावामुळे चंद्रकांत पाटील यांच्या नावत बदल करून राज्याचे पालकमंत्री रमेश बैस त्यांना पुण्याचे ध्वजारोहण केले. तर अजित पवार यांनी कोल्हापूरचे ध्वजारोहण केले. यामुळे अजित पवारांना पुन्हा एकदा पुण्याचे पालकमंत्री होण्याचासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते.

हेही वाचा – शरद पवारांवरील टीकेनंतर छगन भुजबळांविरोधात ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

चंद्रकांत पाटील बैठका घेत नाही, यावर अजित पवार म्हणाले…

तुम्ही पालकमंत्री असताना दर आठवड्याला बैठका घेत होतात. पण चंद्रकांत पाटील अशा बैठका घेत नाही, पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवारांनी मिश्किली उत्तर दिले. अजित पवार म्हणाले, “मला माहिती आहे की, मी घेतल्या बैठकीचा परिणाम सात दिवस राहणार आहे म्हणून मी पुढच्या आठवड्यात घेत असतो. तर काहींना वाटेत की, आपण घेतलेल्या बैठकीचा परिणाम एक ते दोन महिने राहणार आहे. त्यामुळे ते 1 ते 2 महिन्यांनी बैठका घेतात.

हेही वाचा – आगामी निवडणुका भाजप आणि शिवसेनेसोबत लढू; बीडच्या सभेत अजित पवारांचे वक्तव्य

खेळीमेळीच्या वातावरणात काम करतो

यापूर्वी तुम्ही आणि चंद्रकांत पाटील एकमेकांच्या बैठला जात नव्हता, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “तुम्ही काही अंदाज व्यक्त करता, असे काही नाही, असे उत्तर त्यांनी मध्यमांना दिले. पुढे अजित पवार म्हणाले, “मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात काम करतोय. राज्याच्या हिताच्या दृष्टीकोणातून निर्णय व्हावे आणि त्यांची आंबलबंजाणी व्यवस्थितीत व्हावी,याबद्दल आमचा प्रयत्न असतो. तसेच जिल्ह्यात काम करताना कोणाच्या वेगवगळ्या बैठका असतात. गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने पार पाडता यावा, पुणेकर, पिंपरी-चिचवडकरांना आणि प्रशासनांला थोडी मदत व्हावी, याच भावनेने बैठक घेण्यात आली होती.”

- Advertisment -