घरमहाराष्ट्र...तर २३ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार - अजित पवार

…तर २३ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार – अजित पवार

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संमती दिली तर २३ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, असे भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले आहे. येत्या २१ डिसेंबरला अधिवेशन संपत आहे. त्यानंतर रविवारीची सुटी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या संमतीने मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी, २३ डिसेंबरला होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारही त्यानिमित्ताने नागपूरमध्ये आहेत. गुरूवारी अजित पवार यांनी माध्यमांना सांगितले की, ‘मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होत आहे. त्यानंतर शरद पवार औरंगाबादला जाणार आहे. त्यांचा पूर्वनियोजित दौरा आहे. शरद पवार यांनी प्रेस क्लबमध्ये बुधवारी आमदारांची बैठक घेतली होती. त्यात अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारात संदर्भात निर्णय होईल, असे सांगितले आहे. काँग्रसेचे नेते मल्लिकार्जून खरगे यांच्याविषयी काही माहिती नाही. पण, अधिवेशन संपल्यानंतर रविवारी सुटी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संमती दिली दिली तरच २३ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो.’

- Advertisement -

शेतकरी कर्जमाफीविषयी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, ‘कर्जमाफीच्यासंदर्भात राष्ट्रवादीची बैठक होणार होती. पण, ती झाली नाही. शरद पवार दुसरीकडे दौर्‍यावर गेले होते. कर्जमाफीचा निर्णय घेताना किती ताण तिजोरीवर पडणार आहे? किती माफी द्यायची? राज्याचे उत्पन्नाचे स्त्रोत व्यवस्थित सुरू आहेत का? केंद्राकडून जीएसटीचा वाटा वेळेवर मिळत आहे का? याचा विचार केला जाईल. भाजपचे सरकार असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८९ लाख शेतकर्‍यांना कर्जमाफी देणारी देशातील सर्वात मोठी कर्जमाफी अशी घोषणा केली होती. पण, नवे सरकार आल्यानंतर असे समोर आले आहे की, इतकी रक्कम लागलेली नाही. सरकारने नियम लावले. त्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले.’

‘महाविकास आघाडीच्या सरकारमधील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपापली भूमिका मांडलेली आहे. भारत एकसंध राहिला पाहिजे. ठराविक लोकांना समोर ठेवून निर्णय घ्यायला नको. या कायद्यासंदर्भात दोन मतप्रवाह आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही याविरोधात भूमिका मांडली आहे. मुंबईत गेल्यानंतर अ‍ॅटर्नी जनरल यांच्याकडून माहिती घेऊ आणि त्यानंतरच बोलणे योग्य ठरेल’, असेही अजित पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -