घरमहाराष्ट्र'डेडलाईन दिल्यावर काम पूर्ण करा नाहीतर गाठ माझ्याशी', अजित पवारांचा अधिकाऱ्यांना इशारा

‘डेडलाईन दिल्यावर काम पूर्ण करा नाहीतर गाठ माझ्याशी’, अजित पवारांचा अधिकाऱ्यांना इशारा

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवार रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. कामाच्या बाबतीत अजित पवार हे नेहमीच वक्तशीर असतात. काम वेळेवर पूर्ण न झाल्यास किंवा काम खराब झाल्यास अदिकाऱ्यांना फटकारल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. याचाच प्रत्यय आज बारामतीत आला. अजित पवार आज सकाळीच बारामती सकाळी ६ वाजताच कामाला सुरुवात केली. त्यानंतर बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात ओपीडीच्या कामावरुन डेडलाईन दिल्यावर काम पूर्ण करा नाहीतर गाठ माझ्याशी, असा इशारा अधिकाऱ्यांना दिला. बारामतीमधील वैद्यकीय महाविद्यालयात सीटी स्कॅन विभागाचे आज लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

रुग्णालयात आपण सुसज्ज व्यवस्था देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. निधीची कुठेही कमतरता महाविकास आघाडी सरकार कमी पडू देत नाही आहे. त्यामुळे आजपासून जी कामे अपूर्ण आहेत त्याची डेडलाईन तुम्हीच द्या. आम्ही तुम्हाला डेडलाईन देत नाही, तुम्हीच डेडलाईन द्या. परंतु, ती डेडलाईन जर पाळली नाही तर माझ्याशी गाठ आहे, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

कुणाचीही ऐपत नाही म्हणून उपचार घेता आले नाहीत, असं होऊ नये. यासाठी सर्व सुविधा बारामतीत उपलब्ध करायच्या आहेत. आरोग्य सेवेची कमतरता भासणार नाही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. रुग्णसेवेत कुठेही कुचराई होता कामा नये, असा दम अजित पवार यांनी दिला. वैद्यकीय व्यवसाय हा लोकांच्या जीवन मरणाशी संबंधित गरीब गरजू रुग्णांना मदत करा. गरीब गरजू रुग्णांना मदत करा, असंही अजित पवार म्हणाले.

पहाटे पाचलाच येऊन बघतो

मी वैद्यकीय महाविद्यालयाबद्दल सूचना केल्या आहेत. त्याची नोंद संबंधित विभागाने घेतली असेल. आता मी त्यावर लक्ष ठेवेल. नाहीतर एखाद्या दिवशी पहाटे पाचलाच येऊन बघतो. काम सुरु आहे की नाही हे चेक करतो, असा इशाराच ्जित पवार यांनी दिला.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -