घरताज्या घडामोडीराज्यात पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याबाबत चर्चा सुरू, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत

राज्यात पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याबाबत चर्चा सुरू, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. कोरोनासंदर्भातील बैठकीमध्ये मोदींनी इंधनावरुन बिगरभाजपशासित राज्यांना इंधनावरुन टोला लगावला होता. यानंतर राज्य सरकारकडूनही मोदींना प्रत्युत्त देण्यात आले होते. राज्य सरकारने इंधनावरील व्हॅट कमी करण्यात यावा असे मोदी म्हणाले होते. भाजपकडून महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागले होते. परंतु केंद्रानेही टॅक्स कमी करावा तसेच महाराष्ट्रात पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तसेच महाराष्ट्रामधून जेवढा कर केंद्राला जातो तेवढ्या प्रमाणात परतावा मिळत नाही अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधनावरील कर कपात करण्याच्या आवाहनावर प्रतिक्रिया दिली होती. कोरोना संदर्भात बैठक घेतली परंतु इंधन दरावरील कर कपात करण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे. केंद्राकडूनही कर आकारला जातो तो त्यांनीसुद्धा कमी करावा अशी मागणी अजित पवार यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्रात राज्य सरकारने गॅसवरील कर कमी करुन महिलांना, रिक्षा चालकांना आणि नागरिकांना दिलासा दिला आहे. आता पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा होणार आहे. परंतु आज निर्णय होणार नाही असे अजित पवार म्हणाले आहेत.

- Advertisement -

दरम्यान अजित पवार म्हणाले की, पंतप्रधानांनी देशातील अनेक मुख्यमंत्र्यांची व्हिसी घेतली होती. कोरोनासदंसर्भातील पार्श्वभूमी आणि देशात काय चालले आहे? त्याची माहिती दिली. तसेच इंधनावर वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित होते. जीएसटी पाच वर्षांकरिता होतं काही राहिलेले पैसे पुढील २ ते ३ महिन्यात येतील असा माझा स्वतःचा अंदाज आहे. पंतप्रधानांनी पेट्रोल डिझेलचा उल्लेख केला. पेट्रोल डिझेलचा दर वाढतो आहे. आपण गॅसवरचा कर कमी केला. साडेतेरा टक्क्यांवरुन ३ टक्क्यांवर आणला. त्यातून हजार कोटींचा महसूल कमी झाला असे अजित पवार म्हणाले आहेत.

राज्याचा टॅक्स जास्त

महाविकास आघाडी सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात गॅसवर दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलच्या बाबतीमध्ये पाहिले की, आयात केल्यावर जो टॅक्स आहे त्यामध्ये केंद्रापेक्षा महाराष्ट्राचा टॅक्स जास्त आहे. त्याच्यामध्ये मार्ग काढण्यासाठी चर्चा करण्यात येईल. परंतु कोणताही निर्णय झाल्यास त्याचे काय परिणाम होणार हे पाहावे लागणार आहे. मुंबई आणि महाराष्ट्रामधून केंद्र सरकारला जेवढा कर मिळतो तेवढा परतावा मिळत नाही अशी टीकासुद्धा अजित पवार यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : नफेखोरीची पोलखोल करताच अरण्यरुदन

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -