यंदाची वारी कोरोना निर्बंधमुक्त असणार, राज्य सरकारचा वारकऱ्यांना दिलासा

एकंदरीत पालखी निघत असताना, वारी निघत असताना त्यामध्ये रुग्णवाहिका असतील, मोबाईल शौचालय असतील, पिण्याच्या पाण्याचे टँकर असतील या सर्वाची मागणी वाढली आहे.

ajit pawar said This year pandharpur Wari Corona will be free from restrictions

राज्यात यंदाची वारी निर्बंधमुक्त होणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये वारीवर कोरोना निर्बंध होते. गेल्या वर्षी कोरोना निर्बंधात आणि मोजकऱ्या वारकऱ्यांसह वारी करण्यात आली होती. मानाच्या पालख्यांना वारीची परवानगी देण्यात आली होती. तसेच एसटीनेच वारी झाली होती. यामुळे लाखो भाविकांना विठ्ठलाच्या दर्शानाला जाता आले नाही. परंतु यंदा भाविकांसाठी राज्य सरकारने दिलासादायक निर्णय़ घेतला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री दत्ता भरणे आणि पंढरपूर जिल्हाधिकारी पुणे आयुक्त यांच्यासोबत वारीसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना यंदाची वारी निर्बंधमुक्त होणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच यंदाच्या वारीसाठी मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले की, वारीच्या संदर्भात आढावा बैठक घेतली होती. २० तारखेला देहू वरुन संत तुकाराम महाराजांची निघणार आहे. यानंतर २१ तारखेला संत ज्ञानेश्वर महाराजांची निघते आहे. याबाबतचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी वारीला काही निर्बंध आणावे लागली होती. २ वर्ष कोरोनाच्या निर्बंधामध्ये वारी करण्यात आली. मोठ्या प्रमाणात लोकांना जाता आले नाही. परंतु यंदा १५ लाख भाविक जमतील अस विचार करुन विसाव्याच्या ठिकाणाची व्यवस्था याबाबत चर्चा करण्यात आली. ९ ते १० महत्त्वाच्या मानाच्या पालख्यांचा आढावा घेतला आणि ज्या सूचना होत्या त्यांचे स्वागत केले आहे. पुणे जिल्हा आयुक्त सौरव पंढरपूरला जाऊन व्यवस्था पाहतील.

एकंदरीत पालखी निघत असताना, वारी निघत असताना त्यामध्ये रुग्णवाहिका असतील, मोबाईल शौचालय असतील, पिण्याच्या पाण्याचे टँकर असतील या सर्वाची मागणी वाढली आहे. यशोदामध्ये ट्रेनिंग ठेवलं आहे. २५ हजारांचा स्टाफ हा पालखीच्या निमित्ताने तैनात करण्यात आला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे ८ ते ९ हजार पोलिसांची संख्या आहे. तसेच एसटी चालकांची आहे. अधिकच्या बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा : Corona Virus : मास्क सक्ती नाही तर मास्क वापरण्यासाठी आवाहन करतोय : अजित पवार