घर महाराष्ट्र बारामतीत विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, जे चोरता येणार...

बारामतीत विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, जे चोरता येणार…

Subscribe

 

बारामतीः जे चोरता येणार नाही, असं काम करण्याचा प्रयत्न करतो आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामती येथे सांगितले. बारामतीत नवीन बसस्थानकाचे काम सुरु आहे. त्याबाबत बोलताना अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -

अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत. तेथील ज्येष्ठ नागरिक निवासमधील वाढीव भोजन कक्ष व करमणूक कक्ष इमारतीचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. बाबूजी नाईकवाड्याजवळील नदीपात्रातून कसब्याकडे जाण्यासाठी सुरु असलेल्या नवीन पुलाच्या बांधकामाचा अजित पवार यांनी आढावा घेतला. पुलाच्या संरक्षक कठाड्यावर नक्षीकाम म्हणून भाले लावण्यात आले होते. हे भाले चोरीला गेल्याचे अजित पवार यांच्या लक्षात आले. त्यावेळी घडलेला किस्सा अजित पवार यांनी भाषणात सांगितला.

नवीन पुलाच्या बांधकामा ठिकाणी नक्षीकामाचे भाले चोरीला गेल्याचे माझ्या निदर्शनास आले. मी विचारलं हे भाले कोण काढतं. एकजण म्हणाला मी काढतो. एक भाला काढला की शंभर रुपये मिळतात. एक चपटी ५० रुपयांत येते. एक भाला काढला की दोन वेळचं भागत, असं त्याने सांगितलं. आपण बोलतोय काय, करतोय काय, याचा काहीही मेळ नाही. पण नवीन बसस्थानकाचे कामही सुरु आहे. तेथे असं काम करणार की जे चोरताच येणार नाही, असा दावा अजित पवार यांनी केला.

- Advertisement -

अजित पवार म्हणाले, एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हे निवारा केंद्र खरंच उपयुक्त आहे. पण येथील एका कक्षाचे बांधकाम ५० हजारात पूर्ण झाले होते. त्याच्या नुतनीकरणासाठी तीन लाख रुपये खर्च आला. महागाई कशी वाढत आहे हे सांगण्यासाठी मी खर्च तुम्हाला सांगितला.

भारताच्या लोकसंख्येविषयी माहिती देताना अजित पवार म्हणाले, भारतात तरुणांची संख्या अधिक आहे. ६० वर्षांपेक्षा अधिक ज्येष्ठांची संख्या १० टक्के आहे. १३ कोटी लोक ६० वर्षांपेक्षा पुढचे आहेत. त्यात अजित पवार आहेत. लवकरच सुनेत्रा यांचा नंबरही लागणार आहे. यावर सुनेत्रा वहिनी सुद्धा हसू लागल्या.

- Advertisment -