पुणे : “आपली भूमिका मांडत असताना कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही. ही काळजी घेतली गेली पाहिजे”, असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिला. पुण्यात आज अजित पवारांनी गणेश मंडळांसोबत गणेशोत्सवानिमित्ताने बैठक घेण्यात आली होती. यावेळी अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना छगन भुजबळांना हा सल्ला दिला. बीडमध्ये अजित पवार गटाची रविवार सभा पार पडली. यासभेत छगन भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. यानंतर छगन भुजबळांनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर ठाण्यात त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आली. यावेळी छगन भुजबळांचा पुतळा जाळून त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
छगन भुजबळांच्या भाषणावरून नाराजी व्यक्त केली जात आहे. पण तुम्हाला भुजबळांचे मुद्दे तुम्हाला पटतात का?, या प्रश्नाव अजित पवार म्हणाले, “मी सभेत ज्या ठिकाण बसलो होतो. त्या ठिकाणाहून मला त्यांचे भाषण ऐकू आले नाही. कारण, समोर बसलेल्या जनतेला ते भाषण ऐकू जावे, अशी व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे मला ते भाषण ऐकायला मिळाले नाही. मी पुण्याला आल्यानंतर सोशल मीडियावर मला काही व्हिडीओ पाहायला मिळाला. माझे अजून भुजबळांशी काही बोलणे झाले नाही. माझे स्पष्टमत आहे की, राजकीय जीवनात काम करत असनाता आपण आपली भूमिका अतिशय योग्य पद्धतीने मांडण्याचे काम केले पाहिजे. पण आपली भूमिका मांडत असताना कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही. ही काळजी घेतली गेली पाहिजे.”
सुसंस्कत राजकारण करण्याची आपली परंपरा
अजित पवार पुढे म्हणाले, “आमचे वेगळे विचार असतील, मतप्रवाह असेल. पण यशवंतराज चव्हाण यांनी जी शिकव दिलेली आहे. सुसंस्कत राजकारण करण्याची आपली परंपरा आहे. महाराष्ट्राची परंपरा काय आणि काम करण्याची पद्धत काय आहे. यासर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवाव्यात. पण अलिकडच्या काळात अनेक राजकीय लोक असे काही शब्द वापरतात. प्राण्याची नावे घेतात. सर्वांनी आपपल्या पातळीवर थांबविल्या पाहिजेत. सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, असे माझे स्पष्टमत आहे.”
हेही वाचा – शरद पवारांवरील टीकेनंतर छगन भुजबळांविरोधात ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन
खेळीमेळीच्या वातावरणात काम करतो
यापूर्वी तुम्ही आणि चंद्रकांत पाटील एकमेकांच्या बैठला जात नव्हता, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “तुम्ही काही अंदाज व्यक्त करता, असे काही नाही, असे उत्तर त्यांनी मध्यमांना दिले. पुढे अजित पवार म्हणाले, “मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात काम करतोय. राज्याच्या हिताच्या दृष्टीकोणातून निर्णय व्हावे आणि त्यांची आंबलबंजाणी व्यवस्थितीत व्हावी,याबद्दल आमचा प्रयत्न असतो. तसेच जिल्ह्यात काम करताना कोणाच्या वेगवगळ्या बैठका असतात. गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने पार पाडता यावा, पुणेकर, पिंपरी-चिचवडकरांना आणि प्रशासनांला थोडी मदत व्हावी, याच भावनेने बैठक घेण्यात आली होती.”
भुजबळ नेमके काय म्हणाले
बीडच्या सभेत शरद पवार यांच्यावर छगन भुजबळांनी टीका केली. यावेळी छगन भुजबळ म्हणाले, “मी 23 डिसेंबर 2003 मध्ये उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. तेव्हा मी गृहमंत्री देखील होतो त्या काळात मी तेलगीला अटक करताना मकोका लावण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी तुम्ही मला राजीनामा देण्यास सांगितले. झी चॅनवर दगडफेक झाली आहे. यानंतर गोयल यांचा फोन आला. तुम्ही राजीनामा द्या. पण गोयल हे म्हणाले की, भुजबळांचा दोष नाही, मग असे असतानाही तुम्ही माझा राजीनामा का घेतला”, असा सवाल भुजबळांनी पवारांना केला आहे.