घरताज्या घडामोडीलोकसभेच्या जागांबाबत उद्धव ठाकरेंनी मांडलेल्या मतांबद्दल अजित पवार म्हणतात...

लोकसभेच्या जागांबाबत उद्धव ठाकरेंनी मांडलेल्या मतांबद्दल अजित पवार म्हणतात…

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत. अशातच लोकसभेच्या जागांबाबत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मांडलेल्या मतांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकप्रकारे स्पष्टीकरण दिलं आहे.

अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना जागा वाटपाबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होती. तेव्हा अजित पवार म्हणाले की, १६-१६-१६ चा फॉर्म्यूला ठरलेला मलाही माहिती नाही. परंतु माझी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, मागील काळात जिंकलेल्या जागा आम्हाला रहाव्यात, अशी इच्छा ठाकरेंनी व्यक्त केली होती. परंतु यापुढील कोणत्याही चर्चेला सुरूवात झालेली नाही. तिन्ही पक्षांची लोकं नेमली जाणार आहेत. त्यानंतर चर्चेला सुरूवात होणार आहे. चर्चा सुरू झाल्यानंतर यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीच्या ज्या लोकसभेच्या जागा आहेत. त्या जागा सोडून २५ जागांबाबत चर्चा करावी. कारण त्या २५ जागा आमच्या कोणत्याही पक्षाच्या नाहीत, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. राज्यपालांची आशिष शेलार यांच्यानंतर भाजप नेत्यांची भेट झाली. मन की बात झाल्याचं सांगितलं जातंय, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, अजित पवार म्हणाले की, जेव्हा राज्यपाल महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्यासोबत माझी भेट झालेली नाही. आपल्या भारतात माजी झालेल्या व्यक्तीला एखाद्या पदावरून गेल्यानंतर त्यांना कुठल्या राज्यात जावंसं वाटत असेल तर त्यांना जाता येतं. माजी राज्यपालांचं मागील काही काम अपूर्ण राहिलं असेल, त्यासाठी ते आले असतील, असं पवार म्हणाले.


हेही वाचा : ‘राष्ट्रपतींचा वारंवार अपमान’, राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात म्हणाले, अशाच व्यक्तींना…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -