घरमहाराष्ट्रपुणेअजित पवार म्हणतात, तात्या वाट पाहतोय..., मनसेचे वसंत मोरे राष्ट्रवादीच्या वाटेवर?

अजित पवार म्हणतात, तात्या वाट पाहतोय…, मनसेचे वसंत मोरे राष्ट्रवादीच्या वाटेवर?

Subscribe

पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फायरब्रॅण्ड नेते वसंत मोरे सध्या पक्षावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यातच, ते आता राष्ट्रावादीचे घड्याळ मनगटावर बांधणार असल्याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. कारण, राष्ट्रवादीत येण्याची खुली ऑफरच राष्ट्रवादीचे बडे नेते अजित पवार यांनी त्यांना दिली आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत वसंत मोरे मनसेच्या इंजिन वापरतात की राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटावर बांधतात हे पाहावं लागणार आहे.

हेही वाचा – मनसेत नाराजी; पुण्याचे वसंत मोरे भाषण करू न दिल्याने नाराज

- Advertisement -

राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर वसंत मोरे यांनी त्यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. तेव्हापासून ते पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच, याप्रकरणामुळे वसंत मोरेंची पुणे शहराध्यक्षपदावरून हकालपट्टी करून साईनाथ बाबर यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे वसंत मोरे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु, त्यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. मधल्या काळात राज ठाकरे पुणे दौऱ्यावर गेलेले असतानाही या दोघांची भेट झाली होती. त्यामुळे यांच्यातील वाद शमल्याचं म्हटलं जात होतं.

हेही वाचा – पुण्यात वसंत मोरे- संजय राऊतांची गळाभेट, वसंत मोरे म्हणाले…

- Advertisement -

परंतु, नुकतेच वसंत मोरे आणि अजित पवार एका लग्नात एकत्र आले होते. तेव्हा तात्या कधी येता… वाट पाहतोय.., असं सूचक विधान अजित पवारांनी केलं होतं. त्यानुसार, वसंत मोरे आता राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. वसंत मोरे हे मनसेचा पुण्याचा चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी ऐन निवडणुकीत मनसेला सोडचिठ्ठी दिली तर मनसेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, आपण मनसे सोडणार नसल्याची स्पष्टोक्ती वसंत मोरे यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -