Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रAjit Pawar : अजितदादांचा व्हिडीओ शेअर करत शरद पवार गट म्हणतो, सरडाच...

Ajit Pawar : अजितदादांचा व्हिडीओ शेअर करत शरद पवार गट म्हणतो, सरडाच विसरला आपला रंग!

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासह समर्थक आमदार राज्य सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात कायदेशीर संघर्ष सुरू झाला. मात्र तरीही, सत्तेत सहभागी असल्याचा विसर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना झाला. त्याच अनुषंगाने, राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाने ‘सरडाच विसरला आपला रंग’ असे म्हणत अजितदादांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा – Maharashtra Crime : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, दोन्ही काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन

- Advertisement -

अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदार-खासदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा केला. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीनंतर पक्ष आणि घड्याळ चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आले. तर, येत्या 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष हे नाव दिले आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला असून त्यांनी अजित पवार यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ते ‘महाआघाडीचं विकासाचं…’ असे म्हणून अडखळल्याचे दिसते. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे.., हे गाणे देखील ऐकायला मिळते.

हेही वाचा – Chhagan Bhujbal : मी गृहमंत्री असताना धमक्यांचे प्रकार थांबवले होते, भुजबळांचा इशारा कोणाकडे?

आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी सरडा आपला रंग बदलतो. पण सारखा रंग बदलताना आपण आत्ता नक्की कुठे आहोत, याचे भान मात्र त्याला राहात नाही. अजित पवार यांच्या तोंडी महविकास आघाडीचे नाव येणे, हा त्यातलाच प्रकार आहे, असे सांगताना, राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाने, उपमुख्यमंत्री जरा सांभाळून, घार घिरट्या घालतेच आहे, असा सावधगिरीचा इशाराही दिला आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray : ‘राज्यपालांकडून आम्हाला अपेक्षा नाही; सरकार हटवा राष्ट्रपती राजवट लागू करा’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -