Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पुणे मेट्रोला अखेर हिरवा झेंडा! वनाझ ते आयडियल कॉलनी मार्गावर मेट्रोची पहिली...

पुणे मेट्रोला अखेर हिरवा झेंडा! वनाझ ते आयडियल कॉलनी मार्गावर मेट्रोची पहिली ट्रायल रन

Related Story

- Advertisement -

बहुप्रतीक्षीत पुणे मेट्रो आज अखेर ट्रायल रनच्या निमित्ताने धावली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. वनाज ते आयडियल कॉलनी मार्गावर पुणे मेट्रोची पहिली ट्रायल रन झाली. अजित पवार यांनी मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर सकाळी सात वाजताच्या सुमारास पुणे मेट्रो धावली. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश मिश्रा हे हजर होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असे सांगितले की, पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर असून निवडणुका झाल्यावर राजकीय विचार बाजूला ठेवून विकास कामाला महत्त्व द्यायचं असतं, हे लक्षात घेऊन आम्ही काम करत आहोत. त्यातूनच पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. पुणेकरांचे आभार मानतो, ही काम सुरु असताना पुणेकरांनी संयम दाखवला, त्याबद्दल पुणेकरांचे आभार मानतो. पीएमआरडीएच्या विकास आराखड्याला कालच मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. दोन रिंग रोड, १० मेट्रो मार्गिका यांचा प्रामुख्याने समावेश आहे. पुण्याला सर्वोत्तम शहर बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे, या सगळ्या कामाला ७५ कोटी रुपये लागतात ऑक्टोबर २०२१ मध्ये निगडी ते दापोडी प्रवास सुरु करु शकतो. पुण्याला सर्वोत्तम शहर बनविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

“सगळे म्हणतात सकाळी कार्यक्रम का घेतला? तर सकाळी सुरुवात चांगली होते. कोरोनाचं संकट आहे, आम्हीच नियम करायचे, अन् मोडायचे कसे? गर्दी नको म्हणून मी सकाळी ६ला घ्या म्हटले होते, पण दीक्षित म्हणाले ७ ला घेऊ. इतर पुणेकरांना त्रास व्हायला नको, गर्दी व्हायला नको. म्हणून कार्यक्रम लवकर घेतला. आम्ही कार्यक्रम घेतो, लोक गर्दी करतात, मग आयोजकांवर गुन्हे दाखल होतात, इथे दीक्षितांवर गुन्हा दाखल व्हायला नको हा ही विचार होता”, असे अजित पवार म्हणाले.


कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस!
- Advertisement -