Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र अजित पवार सत्ताधाऱ्यांवर कडाडले; महापुरुषांचा अपमान, मविआ नेत्यांना अटक अन्...

अजित पवार सत्ताधाऱ्यांवर कडाडले; महापुरुषांचा अपमान, मविआ नेत्यांना अटक अन्…

Subscribe

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची काल तुरुंगातून सुटका झाली, पण त्यांच्या आयुष्यातील 14 महिने वाया गेले. त्यांच्याच विभागातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने १०० कोटी घेतले असा आरोप करता आणि त्यातून राळ उठवली जाते. आम्हीही आरोप करतो मग तुमच्या आमदारांना तुरुंगात टाकणार आहात का? असाही प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे. कुठलाही पुरावा नाही. चांदीवाल आयोगाकडे पुरावे नाहीत म्हणून त्यांच्याकडे कोणी गेलं नाही. शिवसेना नेते संजय राऊत आपल्या सभागृहाचे सदस्य नाहीत ते संसदेचे सदस्य आहेत पण त्यांनाही बाबतीत तेच झालं, असं कोर्टाने म्हटलं, असही अजित पवार म्हणाले.

राजकीय मतमतांतर होईल, त्या व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचे दिवस वाया जातात. आरोप सिद्ध झाल्यानंतर शिक्षा करा. अनिल देशमुख, संजय राऊत यांची काय चुक होती रेकॉर्डवर आलं पाहिजे. हे जे चाललंय, त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आलीय. त्यांच्या कुटुंबीयांवर काय वेळ आली असेल. कायदा सुव्यवस्था करणारेच बिघडवत असतील, अशांतता निर्माण करत असतील, तर करायचे काय? असा सवाल अजित पवार यांनी केला.

- Advertisement -

महापुरूषांच्या अपमानावरून विरोधी पक्षनेते अजित पवार अधिवेशनात आज आक्रमक झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरही अजित पवारांनी आक्षेप घेत म्हटले की, शिवरायांचा जाज्वल अभिमान बाळगणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळखय. त्यांचा झालेला अपमान महाराष्ट्राच्या जनतेला पटलेला नाही. शिवाजी महाराज पुराने जमाने के है. आजचे आदर्श नितीन गडकरी. त्यांच्याबद्दलही आम्हाला सार्थ अभिमान आहे, पण गडकरी साहेब आणि शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकेल का? असा सवाल त्यांनी केला.

कोणत्याही महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही. जे चुकतील त्यांना कायद्याचा बडगा दाखवा, यांना तुरुंगात टाका, पदावरून हाकालपट्टी करा, अशी मागणी अजित पवार यांनी केली. अधिवेशनात अंतीम आठवडा प्रस्तावावर अजित पवार बोलत होते. “सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं आहे. मात्र तेव्हापासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघात नथुराम गोडसेचं उदात्तीकरण केलं जात आहे. तेथे बंदुकीचं निशाण असलेला झेंडा फडकवण्यात आला आहे. गृहमंत्र्यांच्या मतदार संघात या गंभीर घटना घडत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलाय.

- Advertisement -

राज्यपाल म्हणाले, कल्पना करो, शादी दस साल में ही कर दी थी. तब जोतीराव तेरा साल के उमर के थे. तब लडका लडकी क्या करते होंगे शादी के बाद. हातवारे करून ते हसत-हसत हे सतत चालू आहे. मुख्यमंत्री काही कामानिमित्त दिल्लीला जाऊ शकतात. त्यांनी दिल्लीत वरिष्ठांच्या कानावर घातलं पाहिजे. काल जसे ठोकून सांगितले, मुंबई आमचीच कोणाच्या बापाची नाही, तसेच इथेही करावे, असे आवाहन त्यांनी केले.

समर्थाशिवाय शिवाजीला कोण विचारतोय?, असे राज्यपाल म्हणाले. कितीदा आमच्या युगपुरुषांचा अपमान करताय. त्यांच्या अपमानाचा विडा उचलून आलाय का? राजमाता जिजाऊंनी त्यांना बाळकडू दिले. इतकच नाही तर एका जाहीर कार्यक्रमात चुकीचा इतिहास सांगितला. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू स्वतःला शांतीदूत समजायचे. त्याच्यामुळे देश कमकुवत राहिला, असे कोश्यारी म्हणाले. मात्र, त्यावेळी देशात टाचणी तयारी व्हायची नाही आणि आता असे बोलले जाते. हे बाकीचे करण्यापेक्षा पंडित नेहरूंबद्दलचे चार पुस्तके वाचा ना. पहाटे चारला उठता. असा टोला लगावत संविधानिक पदाची शोभा राखण्यासाठी असली वक्तव्य टाळावीत, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यपाल मुंबईबद्दल काय म्हणाले की, गुजराती – राजस्थानी माणसाला मुंबईच्या बाहेर काढले, तर मुंबईत पैसा उरणार नाही., वारे पट्टे. ही भाषा राज्यपाल महोदयांची. त्यांना एकनाथ शिंदे यांचे सरकार अस्थिर करायचेय का? त्यामुळे सुरूय का? अशा वक्तव्यामुळे महाराष्ट्रात प्रचंड संताप, आक्रोश, चीड. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यावर जाहीर आक्षेप आणि निषेध नोंदवतील, अशी अपेक्षा होती. साधा निषेध नोंदवत नाहीत. माघारी बोलावण्यासाठी केंद्राला विनंती करतील अशी अपेक्षा होती. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे, असही अजित पवार म्हणाले.

अजित पवार पुढे म्हणाले की, सत्तारुढ पक्षाचे आमदार मंत्री, खासदारांकडूनही हेच सुरू आहे. चंद्रकांत पाटील यांच्या भीक मागितली या वक्तव्याबद्दल ते म्हणाले की, देणगी मागितली, मदत मागितली, लोववर्गणी मागितली असे ते म्हणू शकत होते. ज्यांच्याबद्दल असे बोलता. जरा इतिहासात खोलात जा. महात्मा फुले यांच्या कंपनीचा टर्नओव्हर होता २० हजार रुपयांचा होता आणि टाटांचा टर्नओव्हर १९ हजार रुपयांचा होता. चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीचे समर्थन करत नाही. शाई फेकल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पत्रकारांवर गुन्हा दाखल केला, हा कसा न्याय? नंतर फेस शिल्ड वापरुन फिरायला लागले, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडे शाईचा पेन असेल तर जप्त करा. तुम्ही माझ्या अंगावर शाई फेकाल, आम्हाला विधान भवनात शाई पेन आणायला बंदी आहे, असा टोला लगावत आमच्यावर अविश्वास करता हे बरोबर नाही. लाइटली घेऊ नका, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे.

अजित पवार पुढे म्हणाले की, शिवरायांचा गनिमा कावा कुठला? तुमचा गनिमा कावा कुठला? तुम्हाला मंत्रिपद हवंय ना, घ्या ना. पण मुख्यमंत्र्यांना एवढं कुठं हरबऱ्याच्या झाडावर चढवताय. छत्रपतींचा गनिमी कावा हिंदवी स्वराज्यासाठी होता. तुमचा गनिमी कावा कशासाठी होता? याचाही विचार केला पाहिजे. मंगलप्रभात लोढा पहिल्यांदा मंत्री झाले. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन शिवराय जसे निसटले, तसे शिंदे निसटले म्हणतात. एक आमदार बोलतात की, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला म्हणतात. शेंबड्या पोराला विचारले, तर सांगतो त्यांचा जन्म शिवनेरीवर झाला. तुम्ही वेळ काढा. इतिहासाची माहिती घ्या…माहिती नसेल, तर बोलू नका. एक म्हणतात, अफजलखानाने शिवाजी महाराजांचा कोथळा बाहेर काढला, हे काय सुरूय, असा सवाल त्यांनी केला.

एकजण म्हणतात की शिवाजी महाराज यांचा कोथळा अफझल खान यांनी काढला. त्यानंतर चुकून झालं म्हणतात आणि शंभूराजे तुम्ही त्यांचं समर्थन करता. भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली. हा निल्लर्जपणाचा कळस आहे. तुम्हाला राग कसा येत नाही? इतिहास तोडून – मोडून मांडताय. तुमची सटकत कशी नाही? सटकली पाहिजे. एवढ्या महापुरुषांचा अपमान होऊनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्री गप्प कसे? हे प्रकरण गंभीर आहे. यापुढे कोणत्याही महापुरुषाचा अपमान सहन केला जाणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी अशा वक्तव्यांचा साधा निषेध देखील केला नाही. मुख्यमंत्री नको त्या निष्पाप लोकांना जेलमध्ये टाकण्याच्या ऐवजी या लोकांना जेलमध्ये टाका. त्यांच्या ही डोक्यात प्रकाश पडू द्या, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

गुलाबराव महिला सहकाऱ्यांना नट्यांची उपमा कशी देता? तुमची-आमची बहीण,आई, असेल? असा सवाल त्यांनी केला.


कोरोना, लॉकडाऊन त्यांचा आवडता विषय; मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना डिवचले

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -