घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023मनसेचा एकच आमदार, त्यांनी पक्षावर दावा केला तर... अजित पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल

मनसेचा एकच आमदार, त्यांनी पक्षावर दावा केला तर… अजित पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल

Subscribe

'40 आमदार एका बाजूला असल्याने त्या गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले. उद्या मनसेचा एक आमदार आहे. उद्या त्या आमदाराने पक्षावर दावा केल्यास त्यांचा पक्ष होणार का', असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला केला.

’40 आमदार एका बाजूला असल्याने त्या गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले. उद्या मनसेचा एक आमदार आहे. उद्या त्या आमदाराने पक्षावर दावा केल्यास त्यांचा पक्ष होणार का’, असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला केला. ‘निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेले आहेत’, असेही अजित पवार यांनी म्हटले. (Ajit Pawar Slams Election Commission Decision On Shiv Sena Party And Symbol)

सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशन सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (रविवार) विरोधी पक्षांनी आज अधिवेशनातील रणनितीबाबत बैठक घेतली. या बैठकीत विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला विविध मुद्यांवर घेरणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. तसेच, नुकताच शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर निशाणा साधला.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह काढून एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय हा पक्षपातीपणाचा असल्याची भावना लोकांमध्ये असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. 40 आमदार एका बाजूला असल्याने त्या गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले. उद्या मनसेचा एक आमदार आहे. उद्या त्या आमदाराने पक्षावर दावा केल्यास त्यांचा पक्ष होणार का, असा प्रश्नही पवार यांनी केला.

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यापासून राज्यात त्यांच्याविरोधात जनभावना तिव्र होत आहे. निवडणूक आयोगाच्या लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. विद्यमान शिंदे सरकार हे बेकायदा आणि घटनाबाह्य असून, या सरकार अपात्रतेची टांगती तलवार कायम असल्याचे सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा युक्तीवादातून स्पष्ट होत आहे’, असे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

‘महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अभिमान जपण्यात शिंदे-फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. राज्यात गुंतवणूक येत नाहीत. मागील काळात आलेल्या गुंतवणूका ज्यामुळे युवकांना रोजगार उपलब्ध झाला असता. परंतु, त्याही गुंतवणुका राज्याबाहेर गेल्या. मोठ्याप्रमाणात राज्याचे आर्थिक नुकसान झाले’, असेही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, यावेळी ‘जिल्हा वार्षिक योजनेचे पैसे खर्च झालेले नाहीत. सरकारचं याकडे अजिबात लक्ष नाही. जिल्हा नियोजन समितीमधुन जी कामे होणे अपेक्षित होते मात्र ते झाले नाहीत’, असा आरोपही पवारांनी केला.


हेही वाचा – 5 क्विंटल कांद्याच्या विक्रीनंतर शेतकऱ्याला केवळ 2 रुपयांचा चेक; अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -