घरताज्या घडामोडी"कॉन्टॅक्ट चांगलेत, पक्षवाढीसाठी UN मध्ये पाठवू या," अजित पवारांचा गिरीश महाजनांना टोला

“कॉन्टॅक्ट चांगलेत, पक्षवाढीसाठी UN मध्ये पाठवू या,” अजित पवारांचा गिरीश महाजनांना टोला

Subscribe

युनायटेड नेशनची जबाबदारी महाजन यांना देऊ. गिरीश महाजन यांचे चांगले कॉन्टॅक्ट आहेते ते झटपट लोकांना कॉन्टॅक्ट करतात, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली.

युनायटेड नेशनची जबाबदारी महाजन यांना देऊ. गिरीश महाजन यांचे चांगले कॉन्टॅक्ट आहेते ते झटपट लोकांना कॉन्टॅक्ट करतात, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. विधानसभेत भाष्य करताना त्यांनी प्रलंबित प्रस्तावावर चर्चा करताना राज्याचे ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन यांच्यावर टोलेबाजी केली. (Ajit Pawar slams Girish Mahajan in vidhan sabha winter session)

“गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री पद नाही तर मोठी जबाबदारी द्यायचे ठरले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पक्ष वाढवण्यासाठी त्यांना जबाबदारी दिली जाणार आहे. त्यांचा संपर्क तसा आहे. युनायटेड नेशनची जबाबदारी महाजन यांना देऊ. गिरीश महाजन यांचे चांगले कॉन्टॅक्ट आहेते ते झटपट लोकांना कॉन्टॅक्ट करतात”, असे म्हणत अजित पवार यांनी महाजनांना टोला लगावला.

- Advertisement -

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज राज्यातील प्रलंबित विषयांवरून शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले. अजित पवार यांनी आपल्या हटके स्टाइलनं सत्ताधारी मंत्र्यांवर निशाणा साधला. याशिवाय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी असल्याच्या मुद्द्यावरुन टीका केली. तसेच, मुख्यमंत्री पद हे राज्यातील सर्व विभागाला मिळाले आहे, पण उत्तर महाराष्ट्राला आजवर मिळालेलं नाही अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.

दरम्यान, भाजपाचे नेते बारामती विधानसभा मतदार संघात जाऊन विधान करत आहेत. त्यावरूनही त्यांच्यावर आज अजित पवारांनी हल्लाबोल केला. “बारामतीत येऊन काहीजण करेक्ट कार्यक्रम करण्याच्या वल्गना करतात. पण मी एक सांगतो जर मी मनात आणलं तर जे वल्गना करताहेत त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होईल”, असे अजित पवार यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – “स्वत: कडे 6-6 खाती, कोल्हापूरच्या वाघाला फक्त दोन खाती, तळतळाट लागेल ” अजितदादांचा फडणवीसांना टोला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -