घरताज्या घडामोडीमेडिकलवाल्यांना नोटा मोजायला वेळ कसा मिळतो?, अजितदादांनी कोरोना टेस्ट कीटवरुन फटकारलं

मेडिकलवाल्यांना नोटा मोजायला वेळ कसा मिळतो?, अजितदादांनी कोरोना टेस्ट कीटवरुन फटकारलं

Subscribe

१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत ५१ टक्के मुलांचे जिल्ह्यात लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. पुढील काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. तसेच राज्यात कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. कोरोना टेस्ट कीट मेडिकल स्टोअर्समध्ये विकण्यास परवानगी दिली आहे. पंरतु याची नोंद ठेवणं बंधनकारक आहे. यावर मेडिकलवाल्यांनी आक्षेप घेतला आहे. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेडिकलवाल्यांना फटकारलं आहे. मेडिकल मधून टेस्ट कीट नेणाऱ्यांची नोंद ठेवण्यात वेळ जातो अशी मेडिकल चालकांनी तक्रार केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे अजित पवारांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केलं आहे. तसेच मेडिकल चालकांनी कोरोना टेस्ट कीट घेणाऱ्या ग्राहकांची नोंद करण्यास टाळाटाळ केली आहे. लोकांची नंबर नोंद करण्यामध्ये वेळ जातो अशी माहिती मेडिकल चालकांनी दिली आहे. यावर अजित पवारांनी संताव व्यक्त केला आहे. मेडिकलवाल्यांना वेगळी काय माहिती द्यायची आहे. केवळ नंबर घ्यायचे आहेत. नोटा मोजायला कसा वेळ मिळतो? तोपर्यंत दहा अकडी नंबर लिहून होतो. किट घेणाऱ्यांची नोंद ठेवणं बंधनकारक असल्याचे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. जिल्ह्यातील शाळा सुरु करणयाबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर घेण्यात येईल असे अजित पवार म्हणाले आहेत. खेळाडूंची गैरसोय टाळण्यासाठी अजित पवार यांनी दोन लसींचे डोस घेतलेल्यांसाठी जलतरण तलाव सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच खेळाची मैदाने सुरु करण्याची परवानगी दिली आहे. भीमाशंकर देवस्थानी दर्शनासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच इतर देवस्थानाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे अजित पवार यांनी सांगितले आहे.

गर्दी वाढल्यास पर्यटन स्थळांवर निर्बंध

गर्दी वाढल्यास पर्यटन स्थळांवर निर्बंध लादण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कामगारांना लस दिले पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांना शनिवार आणि रविवारी लसीचा तिसरा डोस देण्यात येणार आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत ५१ टक्के मुलांचे जिल्ह्यात लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : कोरोनाची लाट पुढील 8 ते 15 दिवस राहू शकते, अजित पवारांचं भाकीत

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -