पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाबाबत दिलीप वळसे पाटलांसह अंतिम निर्णय घेणार, अजित पवारांची माहिती

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २१ लोकांची निवडणूक मधल्या काळामध्ये झाली. काही सदस्य बिनविरोध आले तर काहींची निवडणूक झाली. त्यानंतर आम्ही अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाबाबत सविस्तर चर्चा केली. कारण आम्ही राज्याचं आणि तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे लोकांच्या मनात नक्की काय आहे. हे जाणून घेण्यासाठी आम्ही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, दत्ता भरणे, संजय जगताप, काँग्रेस अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसोबतच चर्चा करण्यात आली. परंतु मी आणि दिलीप वळसे पाटील अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.

पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाबाबत आज बैठक घेण्यात येणार असून कोणत्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यासंदर्भात अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी म्हणाले की, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २१ लोकांची निवडणूक मधल्या काळामध्ये झाली. काही सदस्य बिनविरोध आले तर काहींची निवडणूक झाली. त्यानंतर आम्ही अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाबाबत सविस्तर चर्चा केली. कारण आम्ही राज्याचं आणि तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे लोकांच्या मनात नक्की काय आहे. हे जाणून घेण्यासाठी आम्ही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, दत्ता भरणे, संजय जगताप, काँग्रेस अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसोबतच चर्चा करण्यात आली. परंतु मी आणि दिलीप वळसे पाटील अंतिम निर्णय घेणार आहोत. मी बैठकीला जात असून अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे फॉर्म भरले जाणार आहेत. तसेच ते बिनविरोध निवडून येतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

पवारांच्या नावे खंडणी मागण्याचा प्रयत्न

माझ्या कानावर यासंबंधीत माहिती आली आहे. कारण अतुल गोयल यांना फोन करण्यात आला होता. कारण अतुल गोयल मला ओळखतात. कारण त्यांना माहिती आहे की, माझा नंबर ज्यावेळेस जातो. त्यावेळेस पलीकडील बाजूस प्रायव्हेट नंबर येतो. मात्र, त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे माझं नाव तिथे गेले आणि माझे नाव तिकडे गेल्यामुळे त्यांना संशय आला. त्यानंतर मी मुंबईमध्ये असताना त्यांनी मला कळवलं. ही गोष्ट समजल्यानंतर मी सीपीशी संपर्क साधला. दिलीप वळसे-पाटील यांच्यासह सायबरला माहिती दिली असता, त्यांनी चौकशी केली. चौकशीमध्ये सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची सूचना गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे, असं अजित पवार म्हणाले.

राज्यस्तरावरील निर्णय मुख्यमंत्री घेतात

राज्यस्तरावरील जे काही निर्णय असतात ते निर्णय मुख्यमंत्री घेतात. नियमावली मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असून काही जणं आपल्याचं घरी उपचार घेत आहेत. त्यासंबंधीत माहिती सुद्धा केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून राज्य विभागाच्या आयोगाला देण्यात येत आहे. तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यासंबंधीत माहिती देत आहेत. परंतु जर उद्या ऑक्सिजन बेडची मागणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि ७०० मेट्रीक टन पेक्षा ऑक्सिजनची मागणी राज्यात करण्यात आली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं देखील अजित पवार म्हणाले.


हेही वाचा : Weather Today: उत्तर भारतात धुक्याच्या चादरीसह थंडीचा कहर, ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, जाणून घ्या