सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार लांबवण्यात काय अर्थ?, अजित पवारांचा सवाल

शिंदे गट-भाजप युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्रिमंडळाबाबत सवाल उपस्थित करत सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार लांबवण्यात काय अर्थ?, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार लांबव्यात काय अर्थ?

अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शिंदे गट-भाजप युती सरकारने आपलं बहुमत सिद्ध केलं, विश्वासदर्शक ठराव मंजूर केला आणि विधानसभा अध्यक्षांची निवडही त्यांनी केली. मग मंत्रीमंडळ विस्तार लांबवण्यात काय अर्थ आहे. कारण अशापद्धतीने पाऊस पडत असताना सगळीकडे पालकमंत्री तातडीने नेमनं आणि त्यांना जबाबदारी देणं. पालकमंत्र्यांनी तिथल्या सर्व मंत्र्यांना विश्वासात घेऊन ज्याठिकाणी जीवितहानी होऊ पाहत असेल. तसेच ज्याठिकाणी रहदारीचा, वाहतुकीचा खोळंबा होत असेल, तर अशा ठिकाणी तातडीने पाऊल उचलण्याची गरज असते. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना राज्याच्यावतीने आवाहन करतो की, त्यांनी राहिलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करावा. त्यांना वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी देण्यात यावी, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

आमचं मत व्यक्त करणं जास्त उचित ठरेल

जे राज्याच्या आणि जनतेच्या हिताचे निर्णय असतात, ते निर्णय नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर पुढे घेऊन जातात. त्यामध्ये बदल करण्यात काहीच अर्थ नसतो. स्वत: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बैठक घेणार आहेत. अशा प्रकारच्या बातम्या देखील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आल्या आहेत. जोपर्यंत त्याबातमीत १०० टक्के तथ्य असून त्यावर निर्णय घेतल्यानंतर त्याबद्दल आम्ही आमचं मत व्यक्त करणं जास्त उचित ठरेल, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

रोपं आणि भात ज्या ठिकाणी खराब झाली त्यांना उपलब्ध करून द्यावीत

चांद्यापासून बांद्यापर्यंत अडचणीत असणाऱ्या आणि अतिवृष्टीमुळे जो काही लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तो त्रास तातडीने दूर करावा. त्यामध्ये दुपार पेरणी करावी लागणार आहे. रोपं आणि भात ज्या ठिकाणी खराब झाली आहेत. त्यांना त्याठिकाणी उपलब्ध करून द्यावीत. ज्यांच्या जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तसेच जे पंचनामे तातडीने करावे लागणार आहेत. तसेच ज्या ठिकाणी घरं पडली, त्याठिकाणी सुद्धा तातडीने पंचनामे करावे लागणार आहेत, असं पवार म्हणाले.


हेही वाचा : इतिहास बदलण्याची ताकद शिंदे गटात नाही: संजय राऊतांचा हल्लाबोल