Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी निवृत्तीच्या निर्णयाचा शरद पवार दोन-तीन दिवसांत फेरविचार करणार - अजित पवार

निवृत्तीच्या निर्णयाचा शरद पवार दोन-तीन दिवसांत फेरविचार करणार – अजित पवार

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. शरद पवारांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळी आणि पदाधिकाऱ्यांनी पवारांना निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. मात्र, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या महाविकास आघाडीवर या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शरद पवार यांच्यासोबत सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडलयानंतर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना पवारांचा निरोप सांगितला.

अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आज सकाळी ११ वाजता कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला अनेक कार्यकर्ते हे साहेबांच्या प्रेमापोटी आले होते. परंतु शरद पवारांनी अचानकपणे हा निर्णय घेतला. असा निर्णय पवार साहेब घेतील हे कुणाच्याही लक्षात आलं नव्हतं. मात्र, तो एक प्रकारचा धक्का होता. हा निर्णय घेतल्यानंतर साहेब बराच वेळ आपल्या सहवासात थांबले. त्यानंतर ते सिल्व्हर ओकवर गेले. परंतु कार्यकर्त्यांची गर्दी पाहता स्वत: साहेबांनी फोन करून सुप्रिया सुळे यांच्या फोनद्वारे तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

विद्या चव्हाण, वंदना चव्हाण, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, रोहित पवार, चेतन तुपे, प्रुफल्ल पटेल, अशोक पवार, शेखर निकम आणि जितेंद्र आव्हाड हे सर्वजण सिल्व्हर ओकवर दाखल झाले होते. फेरविचार करण्याबाबत आम्ही शरद पवार यांच्याशी चर्चा केली. परंतु या चर्चेनंतर त्यांनी कार्यकर्त्यांना निरोप देण्यास सांगितला. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मला फेरविचार करण्यास दोन ते तीन दिवस लागतील, असं शरद पवारांनी सांगितल्याचं, अजित पवार म्हणाले.

जेव्हा कार्यकर्ते आपापल्या घरी निघून जातील, तेव्हा मी निवृत्तीचा फेरविचार करीन. परंतु कार्यकर्त्यांनी असाच जर हट्ट धरून ठेवला, तर मी माझा निर्णय बदलणार नाही. परंतु राज्यात उस्मानाबाद, बुलडाणामधील जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला. या राजीनाम्यांचं सत्र ताबडतोब थांबवलं गेलं पाहिजे. कुणीही राजीनामा देण्याचं कारण नाही, असंही पवारांनी सांगितल्याचं अजित पवार म्हणाले.


- Advertisement -

हेही वाचा : पवारांचा हा वैयक्तिक निर्णय, मला कल्पनाही नव्हती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 

- Advertisment -