Homeमहाराष्ट्रAjit Pawar : धनंजय मुंडेंचा राजीनामा नाहीच? दमानियांनी दिलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासणार

Ajit Pawar : धनंजय मुंडेंचा राजीनामा नाहीच? दमानियांनी दिलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासणार

Subscribe

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी (27 जानेवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत त्यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडच्या आर्थिक संबंधाबाबत पुरावे दिले. मात्र अंजली दमानिया यांनी दिलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला संशयित वाल्मीक कराड हा पोलिसांना शरण आला आहे. त्यांच्यावर मकोकाअंतर्गात कारवाई करण्यात आली असून सध्या तो बीड जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधी पक्षाचे नेते धनंजड मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना दिसत आहेत. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी (27 जानेवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत त्यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडच्या आर्थिक संबंधाबाबत पुरावे दिले. मात्र अंजली दमानिया यांनी दिलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. (Ajit Pawar statement that he will check the authenticity of the documents provided by Anjali Damania)

माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, अंजली दमानिया यांनी काही कागदपत्रं माझ्याकडे दिली आहेत. ती पाहिल्यानंतर आज मी रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होतो. पण त्यांना नागपूरला जायचे असल्याने मी त्यांना आताच भेटलो. त्यांनी मला सांगितले की, तुम्हाला अंजली दमानिया जशा भेटल्या तशाच त्या मलाही भेटल्या. मलाही त्यांनी काही कागदपत्रे दिली आहेत. पण या प्रकरणात तीन प्रकारच्या चौकशा सुरू आहेत. एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन. त्यामुळे अंजली दमानिया यांनी मला दिलेली कागदपत्रे मी सीआयडी आणि एसआयटीकडे दिली आहेत. कुणी पुरावे दिले तर त्याची शहानिशा करावी लागते, म्हणून ते सीआयडी आणि एसआयटीकडे देण्यात आली आहेत. कागदपत्रांची सत्यता तपासल्यानंतर जी वस्तुस्थिती समोर येईल, त्यानुसार पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवलं जाईल, असं मुख्यमंत्री यांनी सांगितले असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

हेही वाचा – Suresh Dhas : ती क्लिप 15 दिवस चालणार, डिलीट करू नका; सुरेश यांचे आवाहन 

दोषींना पाठिशी घालणार नाही

दरम्यान, अजित पवार म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख यांच्याबाबत जी घटना घडली आहे, त्यासंदर्भात चौकशी सुरू आहे, असे मी आणि मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणी जो कोणी दोषी असेल त्यांना फाशी दिली पाहिजे, तसा आमच्याकडून प्रयत्न सुरू आहे. कुणाची आणखी नावे आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. पण कुणाचा संबंधच नसेल तर कारवाईचा प्रश्नच येत नाही. तसेच कुणालाही या प्रकरणी पाठीशी घालणार नाही. ही माझी, मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे. माझ्यावर आरोप झाले, तेव्ही मी राजीनामा दिला होता. कारण माझी गोष्ट वेगळी होती. माझ्या वेळी जी घटना घडली होती, त्या घटनेने असह्य होऊन मी राजीनामा दिला होता. पण आता चौकशी सुरू आहे. दोषींना पाठीशी घालणार नाही, कारवाई केली जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.

हेही वाचा – Beed Police : परळीत काही अधिकारी 20 वर्षांपासून एकाच पोस्टवर, सुरेश धस यांचा रोख कोणाकडे?