आव्हाडांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर अजित पवार, सुप्रिया सुळेंकडून ही विनंती, आदर्श आमदार म्हणून…

जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, त्यांनी राजीनामा देऊ नये अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

jitendra awhad supriya sule and ajit pawar

मुंबई – गर्दीत धक्का लागल्याचं कारण देत भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, त्यांनी राजीनामा देऊ नये अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.


हेही वाचा पाच-सहा फुटांवर मुख्यमंत्री होते, विनयभंगासंदर्भात खुलासा करावा; अजित पवारांचा शिंदेंवर पलटवार

जितेंद्र आव्हाड संवेदनशील व्यक्ती आहेत. ते एक चांगले लोकप्रतिनीधी आहेत. मुंब्य्राच्या लोकांनी विश्वासाच्या नात्यानं त्यांना निवडून दिलं आहे. अतिशय चांगलं काम ते त्याठिकाणी करत आहेत. एक आदर्श आमदार म्हणून त्यांच्याकडं बघितलं जातं, त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊ नये, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा – …तर गर्दीत रोज शेकडोंनी विनयभंग होतात; आव्हाडांवरील दाखल गुन्ह्यानंतर पत्नीचं ट्विट

जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा देऊ नये, तसा विचारही मनात आणू नये. शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतोय, त्यांनी अनेक चढ उतार, स्थित्यंतरे पाहिली. आपण कधी सरकारमध्ये असतो कधी नसतो. पण सध्या शिंदे फडणवीस सरकार दडपशाही करतंय, असं अजित पवार म्हणाले आहेत.


हेही वाचा – मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय; जितेंद्र आव्हाडांचं ट्विट

एकीकडे त्यांनी राजीनामा देऊ नये अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनंती केली असताना, सत्ताधाऱ्यांनी मात्र हे सर्व राजीनामानाट्य असल्याचं म्हटलं आहे. यंत्रणांवर दबाव आणण्याकरता त्यांनी राजीनाम्याची धमकी दिली असल्याचं शिंदे गटातील माजी नगरसेविका शीतल म्हात्रे म्हणाल्या.