घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगर"विकासकामे आघाडी सरकारच्या काळातील...मग संदीपान भुमरेंनी पैठणला काय दिलं?" अजित पवारांचा सवाल

“विकासकामे आघाडी सरकारच्या काळातील…मग संदीपान भुमरेंनी पैठणला काय दिलं?” अजित पवारांचा सवाल

Subscribe

राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. इथल्या शेतकरी मेळाव्यात संवाद साधताना अजित पवारांनी थेट पैठणचे मंत्री संदीपान भुमरेंवर निशाषा साधलाय.

राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. इथल्या शेतकरी मेळाव्यात संवाद साधताना अजित पवारांनी थेट पैठणचे मंत्री संदीपान भुमरेंवर निशाषा साधलाय. पैठणमधली सगळी विकासकामे ही महाविकास आघाडी सरकारच्या काळातली आहेत. मग मंत्री संदीपान भुमरेंनी पैठणला नक्की काय दिलं? असा खोचल सवाल उपस्थित करत अजित पवारांनी मंत्री संदीपान भुमरेंवर हल्लाबोल केलाय.

आगामी स्थानिक निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्षाचे नेते वेगवेगळ्या जिल्ह्याचे दौरे करत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात सर्वच पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांचे दौरे होताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा दौरा होत आहे. पैठणमधल्या शेतकरी मेळाव्यात उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय.

- Advertisement -

यावेळी पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, औरंगाबादला मंत्रीपद मिळूनही विकास नाही. राज्यात भ्रष्टाचार जोरात सुरू आहे. जवळच्या माणसांना योजनांचं कंत्राट दिलं जातंय. बैठका घेऊन कामांचा आढावा घेतला पाहिजे, पण तसं होत नाही. असं देखील अजित पवार म्हणाले.

“गेल्या १३ वर्षातही औरंगाबाद-पैठण रस्त्याचं चौपरदीकरण करता आलं नाही तर तुमचं ब्रम्हदेवही काही करू शकत नाही.” असं म्हणत अजित पवार यांनी संदीपान भुमरेंवर टीका केलीय. “पैठण तालुक्यात जायकवाडी धरण, दोन सहकारी साखर कारखाने, संत ज्ञानेश्वर उद्यान, आप्पेगाव विकास प्रतिष्ठान, उपसा सिंचन योजना, एमआयडीसी, महाविद्यालय, हे सारं काही राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने दिलंय…मग संदीपान भुमरेंनी पैठणला काय दिलं? असा सवाल देखील अजित पवार यांनी केलाय.

- Advertisement -

“पैठणमध्ये शासकीय जागा स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, आरोपही करण्यात आलाय. तसंच इथे आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे, असं म्हणत अजित पवारांनी भुमरेंना टार्गेट केलंय. जर तुम्ही तुमच्या मतदारसंघात चांगली कामं केली आम्ही कौतुकच करू, असं देखील अजित पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -