घरमहाराष्ट्रखरी शिवसेना कोणाची हे निवडणूक झाल्यावर कळेलच, अजित पवारांनी शिंदे गटाला सुनावले

खरी शिवसेना कोणाची हे निवडणूक झाल्यावर कळेलच, अजित पवारांनी शिंदे गटाला सुनावले

Subscribe

वाद तर घालून चालणार नाही. शेवटी संख्येच्या प्रमाणात जनता कुणाच्या पाठिशी आहे, ते शिवाजी पार्कची सभा झाल्यानंतरच लक्षात येईल. निवडणूक झाल्यानंतर कळेलच की कुणाची शिवसेना खरी, असं अजित पवार म्हणाले.

मुंबई – राज्यात सत्तांतराचा वाद शिगेला पोहोचलेला असतानाच शिवसेना नक्की कोणाची हा प्रश्न सुटलेला नाही. पक्ष आणि चिन्हाबाबत न्यायलयीन प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, खरी शिवसेना कोणाची हे निवडणूक झाल्यावर कळेलच, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले आहेत. दसरा मेळाव्याबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – निदान गणेशोत्सवात तरी खरं बोला, भाजपाच्या बॅनरबाजीवर शिवसेनेचा पलटवार

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यासाठी वाद सुरू आहे. शिवसेना आणि शिंदे गटाने दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी पालिकेला परवानगीसाठी अर्ज केला आहे. पालिका आता कोणाचा अर्ज स्विकारले यावर सर्व अवलंबून आहे. दरम्यान, याच वादात आता मनसेनेही उडी मारली आहे. राज ठाकरेंनी दसरा मेळाव्याला समस्त हिंदूजनांना संबोधन करावं अशी मागणी मनसैनिकांकडून करण्यात आलीय. या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवारांनी बाळासाहेबांचा दाखला देत आठवण शेअर केली आहे.

हेही वाचा – ठाकरेंनी दिलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रद्द करा, मुख्यमंत्री शिंदेची राज्यपालांकडे विनंती

- Advertisement -

अजित पवार म्हणाले की, ‘सगळ्यांनाच परवानगी मागण्याचा अधिकार आहे. पण वर्षानुवर्ष महाराष्ट्रातील सर्व जनता बघत होती की शिवसेनेची स्थापना झाल्यापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्याच सभा तिथे व्हायच्या. बाळासाहेब ठाकरेंनी शेवटी त्याच शिवाजी पार्कच्या मैदानावर सांगितलं होतं की इथून पुढे ही शिवसेना उद्धव ठाकरे पाहतील आणि पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली चालेल. पण त्यानंतर गेल्या २० जूनपासून ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या आहेत त्या सगळ्यांनी पाहिल्या आहेत.”

हेही वाचा – फक्त सोन्याचा धूर निघायचा बाकी आहे, बेरोजगारीवरून शिवसेनेची केंद्रावर उपहासात्मक टीका

ते पुढे म्हणाले की, ‘ज्यांच्या हातात सत्ता असते ते त्यांना हव्या त्या गोष्टी करत असतात. या बाबतीत पहिल्यांदा एकाचा कार्यक्रम होईल आणि नंतर दुसऱ्याचा कार्यक्रम असं काहीतरी होऊ शकेल. वाद तर घालून चालणार नाही. शेवटी संख्येच्या प्रमाणात जनता कुणाच्या पाठिशी आहे, ते शिवाजी पार्कची सभा झाल्यानंतरच लक्षात येईल. निवडणूक झाल्यानंतर कळेलच की कुणाची शिवसेना खरी.’

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -